संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यात देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी बजेटमध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे.
मोदी सरकारने देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी बजेटमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पायाभूत सुविधांच्या बजेटमध्ये तब्बल 11.1 टक्क्याची मोठी वाढ करून, ते 11,11,111 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. हे जीडीपीच्या 3.4 टक्के एवढे आहे.
रेल्वे-सागरी मार्ग जोडण्यावरही भर -
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, जैवइंधनासाठी एक समर्पित योजना आणली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-वाहने उपलब्ध करून दिली जातील. रेल्वे-सागरी मार्ग जोडण्यावरही भर दिला जाणार आहे. पर्यटन केंद्रांच्या विकासाला गती देणार. राज्यांना बिनव्याजी कर्ज दिले जात आहे. टियर 2 आणि टियर 3 शहरे हवाई मार्गाने जोडली जातील.
लक्षद्वीपमध्ये सुरू होणार नवे प्रकल्प -
लक्षद्वीपमध्ये नवे प्रकल्प सुरू होतील. पीएम आवास योजनेतील 70 टक्के घरे महिलांसाठी बांधलेली आहेत. पर्यटन क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला चालना मिळेल. 75 हजार कोटी रुपयांचे कर्ज बिनव्याजी देण्यात आले आहे. एफडीआय देखील 2014 ते 2023 पर्यंत वाढले आहे. सुधारणांसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प येईल. त्यात विकसित भारताचा रोडमॅप मांडण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांवर 11 टक्के अधिक खर्च केला जाईल. लोकसंख्या वाढीबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे.