Join us

Budget 2024: अर्थसंकल्पाशी संबंधित काही खास किस्से, त्याशिवाय बजेटवरील चर्चाच आहे अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 9:36 AM

१ फेब्रुवारी २०२४ रोजी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील.

Budget 2024: १ फेब्रुवारी २०२४ रोजी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील, ज्यामध्ये आगामी आर्थिक वर्ष 2023-24 साठी वित्तीय डेटा आणि कर योजनांचा समावेश असेल. या अर्थसंकल्पाचं महत्त्व वाढतं कारण २०२४ च्या निवडणुकीपूर्वी सादर होणारा हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. आज आम्ही तुम्हाला अर्थसंकल्पाशी संबंधित काही खास किस्से सांगत आहोत.भारताचा पहिला अर्थसंकल्पभारतातील पहिला अर्थसंकल्प ७ एप्रिल १८६० रोजी जेम्स विल्सन, स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ईस्ट इंडिया कंपनीचे राजकारणी यांनी सादर केला. २६ नोव्हेंबर १९४७ रोजी आरके षण्मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता.सर्वात मोठं भाषणविद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२० रोजी २०२०-२१ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सर्वात मोठं भाषण देण्याचा विक्रम केला. निर्मला सीतारामन दोन तास बेचाळीस मिनिटे बोलल्या होत्या. त्यांनी जुलै २०१९ मधील भाषणाचा स्वतःचा विक्रम मोडला, जेव्हा त्यांनी २ तास १७ मिनिटं बोलून पहिला अर्थसंकल्प सादर केला होता.सर्वात छोटं भाषणअर्थमंत्री हिरुभाई मुलजीभाई पटेल १९७७ मध्ये फक्त ८०० शब्द बोलले होते. देशाच्या इतिहासात सर्वाधिक अर्थसंकल्पीय प्रस्ताव मांडण्याचा विक्रम माजी पंतप्रधान मोराराजी देसाई यांच्या नावावर आहे. १९६२ ते १९६९ या काळात त्यांनी १० अर्थसंकल्प सादर केले, त्यानंतर पी चिदंबरम (९), प्रणव मुखर्जी (८), यशवंत सिन्हा (८), आणि मनमोहन सिंग (८) यांचा क्रमांक लागतो.अर्थसंकल्पाची वेळब्रिटिशकालीन पद्धतीनुसार, १९९९ पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या अखेरच्या कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता सादर केला जात असे. १९९९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प सादरीकरणाची वेळ बदलून सकाळी ११ वाजता केली होती. तर तत्कालिन अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी २०१७ मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलून १ फेब्रुवारी केली.अर्थसंकल्पाची भाषा१९५५ पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प इंग्रजीत सादर केला जात असे. पण काँग्रेसच्या नेतृत्वाखालील प्रशासनानं अर्थसंकल्पाची कागदपत्रे हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत छापण्याचा निर्णय घेतला होता.पेपरलेस बजेटकोरोनाच्या महासाथीमुळे २०२१-२२ चा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं सादर करण्यात आला होता.रेल्वे बजेटकेंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प दोन्ही २०१७ पर्यंत स्वतंत्रपणे सादर केले गेले. रेल्वे अर्थसंकल्प २०१७ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात जोडला गेला. रेल्वे अर्थसंकल्प ९२ वर्षे स्वतंत्रपणे सादर केल्यानंतर एकत्र सादर केला गेला.बजेटची छपाई१९५० पर्यंत, राष्ट्रपती भवनात अर्थसंकल्प छापला जात होता, परंतु एका लीकमुळे छपाईची जागा मिंटो रोड, नवी दिल्ली येथील प्रेसमध्ये बदलावी लागली. १९८० मध्ये, अर्थ मंत्रालया असलेल्या ठिकाणी, नॉर्थ ब्लॉकमध्ये एक सरकारी प्रेस स्थापन करण्यात आली.

टॅग्स :केंद्रीय अर्थसंकल्प 2019अर्थसंकल्प 2024बजेट माहिती