Join us  

Union Budget 2024 Tax Slab: टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल, इतके उत्पन्न असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा, नवीन दर येथे पहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 12:52 PM

Union Budget 2024 Tax Slab: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला.

Budget 2024 Tax Slab: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात मोदी सरकारने करदात्यांना सूट देण्याची घोषणा केली आहे. नवीन कर प्रणालीमध्ये ०-३ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही. यासोबतच स्टँडर्ड डिडक्शन ५० हजारांवरून ७५ हजार रुपये करण्यात आले आहे.

Union Budget 2024 Live Updates: नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांवर, अर्थमंत्र्यांचा करदात्यांना दिलासा

आपल्या भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या, सरकार पुढील ६ महिन्यांत आयकर कायदा १९६१ चे पुनरावलोकन करेल. आयकर प्रणाली सोपी केली जाईल, मोठ्या कर प्रकरणांच्या सुनावणीसाठी आणखी अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सरकारने स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी देवदूत कर रद्द करण्याची घोषणाही केली आहे.

नव्या कर प्रणालीमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत.

 ०-३ लाख रुपये- शून्य

३-७ लाख रुपये - ५ टक्के

७-१० लाख रुपये - १० टक्के

१०-१२ लाख - १५ टक्के

१२-१५ लाख रुपये - २० टक्के

१५ लाखांपेक्षा जास्त - ३० टक्के

जुने टॅक्स स्लॅब किती होते?

०-३ लाख रुपये- शून्य

३-६ लाख रुपये - ५ टक्के

६-९ लाख रुपये - १० टक्के

९-१२ लाख - १५ टक्के

१२-१५ लाख रुपये - २० टक्के

१५ लाखांपेक्षा जास्त - ३० टक्के

अर्थसंकल्पात प्राप्तिकरात दिलासा देण्यात आला आहे. नवीन कर प्रणालीनुसार, आता ३ लाख ते ७ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५% दराने कर भरावा लागेल. त्याच्या स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत. याशिवाय, नवीन कर प्रणालीमध्ये आता ५० हजार रुपयांऐवजी ७५ हजार रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे. मात्र, जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मुद्रा योजनेतील कर्जाची मर्यादा २० लाखांपर्यंत वाढवली

या अर्थसंकल्पात लघुउद्योजकांना सरकारने मोठा दिलासा देत मुद्रा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. सरकारने कर्जाची मर्यादा थेट दुप्पट केल्याने व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या उद्योजकांना मदत होणार आहे.

टॅग्स :करनिर्मला सीतारामनअर्थसंकल्प 2024