Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2024: अर्थसंकल्पाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजाराचा मूड, पाहा सेन्सेक्स-निफ्टीचा ट्रेंड

Budget 2024: अर्थसंकल्पाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजाराचा मूड, पाहा सेन्सेक्स-निफ्टीचा ट्रेंड

Budget 2024 : आज केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, मोदी सरकारचा या टर्ममधील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 08:13 AM2024-07-23T08:13:03+5:302024-07-23T08:14:22+5:30

Budget 2024 : आज केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, मोदी सरकारचा या टर्ममधील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

Budget 2024 What is the stock market mood on Budget day see the trend of Sensex-Nifty | Budget 2024: अर्थसंकल्पाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजाराचा मूड, पाहा सेन्सेक्स-निफ्टीचा ट्रेंड

Budget 2024: अर्थसंकल्पाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजाराचा मूड, पाहा सेन्सेक्स-निफ्टीचा ट्रेंड

Budget 2024 : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार २२ जुलैपासून सुरू झाले आहे, आज वित्तमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सामान्यांसाठी कोणत्या घोषणा होतात याची जोरदार चर्चा सुरू आहे. मोदी सरकार या टर्मचा पहिलाच अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होत असतो. २०१४ मध्ये पहिल्यांदा मोदी सरकार सत्तेवर आले, तेव्हापासून आतापर्यंत १२ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात दोन अंतरिम बजेट होते. पहिला अंतरिम अर्थसंकल्प २०१९ मध्ये आणि दुसरा १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर करण्यात आले. यात सातवेळा शेअर बाजार शांततेत होता. मोदी सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प १० जुलै २०१४ रोजी आला. या दिवशी निफ्टी ०.२३ टक्क्यांनी घसरून ७५६७.७५ वर आला. मात्र, पुढील ७ दिवसांत निफ्टीने ०.९६ टक्क्यांनी झेप घेतली आणि ७६४०.४५ वर गेला होता. केडिया ॲडव्हायझरीचे अजय केडिया यांनी NSE डेटावर अहवाल दिला आहे.

आर्थिक सर्वेक्षण : कितीही विरोध केला तरी चीनमधून हवी अधिक गुंतवणूक; दरवर्षी हव्यात ७८ लाख नोकऱ्या

या अहवालानुसार, २५ फेब्रुवारी २०१५ रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार तेजीवर होता. निफ्टी, किरकोळ असला तरी, ०.०६ टक्क्यांनी वाढून ८७६७.२५ च्या पातळीवर होता. अर्थसंकल्पाच्या सात दिवसांनंतर निफ्टी १.७७ टक्क्यांनी वाढून ८९२२.६५ वर पोहोचला.

२९ फेब्रुवारी २०१६ रोजी सादर केलेल्या तिसऱ्या अर्थसंकल्पाच्या दिवशी, निफ्टी ०.६१% घसरला आणि ६९८७ वर बंद झाला. सात दिवसांनंतर शेअर बाजाराने पुन्हा उसळी घेतली आणि निफ्टीने ७.१३ टक्क्यांच्या उसळीसह रॉकेटप्रमाणे ७४८५ वरती गेला.

१ फेब्रुवारी २०१७ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्प दिवशी, निफ्टी १.८१% च्या वाढीवर होता. या दिवशी ८७१६ वर बंद झालेला निफ्टी पुढील ७ दिवसांत ०.६०% वाढून ८७६९ वर पोहोचला. तर, २०१८ मध्ये, निफ्टी अर्थसंकल्प दिवशी ०.१०% च्या घसरणीसह ११०१६ वर बंद झाला. पण, पुढील ७ दिवसांत त्यात ३.९९% ची घट नोंदवली.

मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पादिवशी काय परिस्थिती होती?

मोदी सरकारने १ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या दिवशी निफ्टी ०.५८% ने उसळी घेऊन १०८९३ वर बंद झाला. एका आठवड्यानंतर ०.४६ टक्क्यांनी वाढून १०९४३ वर पोहोचला. यानंतर २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने यश मिळवले. ५ जुलै २०१९ रोजी दुसऱ्या टर्मचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या दिवशी शेअर मार्केट तेजीत असल्याचे पाहायला मिळाला नाही, निफ्टी १.१४% खाली ११८११ वर बंद झाला. पुढे सात दिवस होऊनही बाजार घसरणीतून सावरला नाही २.१९ टक्क्यांनी घसरून ११५५२ च्या पातळीवर आला.

Web Title: Budget 2024 What is the stock market mood on Budget day see the trend of Sensex-Nifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.