नवी दिल्ली : वित्तमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही नोकरदार वर्गास आयकरात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार वित्त वर्ष २०२४-२५ साठी आयकराचे टप्पे (टॅक्स स्लॅब) बदलतील का, असा प्रश्न नोकरदात्यांच्या मनात निर्माण झाला आहे. सध्या व्यक्तिगत आयकरात नवी कर रचना (न्यू रेजिम) आणि जुनी कर रचना (ओल्ड रेजिम) अशा २ व्यवस्था आहेत.
जुनी कर रचना (ओल्ड रेजिम)
नोकरदारांना दिलासा देण्यासाठी या रचनांत काही बदल वित्तमंत्री करू शकतात. जुन्या कर रचनेत वित्त वर्ष २०२३-२४ साठी ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना लागू असलेले आयकर टप्पे आणि कर दर पुढीलप्रमाणे आहेत.
कशा आहेत कर सवलती?
nजुन्या कर रचनेत ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींसाठी करमुक्त उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपये आहे. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी ही मर्यादा ५ लाख आहे.
nजुन्या कर रचनेत व्यक्तीचे करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्यास त्यास १२,५०० रुपये अथवा प्रत्यक्ष लागू असलेला कर यापैकी जी रक्कम कमी आहे, तेवढी कर सवलत (टॅक्स रिबेट) मिळते.