नवी दिल्ली : वित्तमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही नोकरदार वर्गास आयकरात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार वित्त वर्ष २०२४-२५ साठी आयकराचे टप्पे (टॅक्स स्लॅब) बदलतील का, असा प्रश्न नोकरदात्यांच्या मनात निर्माण झाला आहे. सध्या व्यक्तिगत आयकरात नवी कर रचना (न्यू रेजिम) आणि जुनी कर रचना (ओल्ड रेजिम) अशा २ व्यवस्था आहेत.
जुनी कर रचना (ओल्ड रेजिम)नोकरदारांना दिलासा देण्यासाठी या रचनांत काही बदल वित्तमंत्री करू शकतात. जुन्या कर रचनेत वित्त वर्ष २०२३-२४ साठी ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना लागू असलेले आयकर टप्पे आणि कर दर पुढीलप्रमाणे आहेत. कशा आहेत कर सवलती?nजुन्या कर रचनेत ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींसाठी करमुक्त उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपये आहे. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी ही मर्यादा ५ लाख आहे. nजुन्या कर रचनेत व्यक्तीचे करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्यास त्यास १२,५०० रुपये अथवा प्रत्यक्ष लागू असलेला कर यापैकी जी रक्कम कमी आहे, तेवढी कर सवलत (टॅक्स रिबेट) मिळते.