Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अर्थसंकल्पिय तूट ७ टक्क्यांवर जाण्याची शक्यता

अर्थसंकल्पिय तूट ७ टक्क्यांवर जाण्याची शक्यता

मार्च महिन्याच्या अखेरीपासून देशामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.

By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Published: August 31, 2020 05:46 AM2020-08-31T05:46:17+5:302020-08-31T05:46:33+5:30

मार्च महिन्याच्या अखेरीपासून देशामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.

Budget deficit likely to reach 7% | अर्थसंकल्पिय तूट ७ टक्क्यांवर जाण्याची शक्यता

अर्थसंकल्पिय तूट ७ टक्क्यांवर जाण्याची शक्यता

नवी दिल्ली  -  चालू आर्थिक वर्षामध्ये देशाची अर्थसंकल्पिय तूट ही एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या ७ टक्क्यांपर्यत वाढण्याची शक्यता आहे.
ब्रिकवर्क रेटिंग्ज या पतमापन संस्थेने याबाबतचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामध्ये वरील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ही तूट ३.५ टक्क्यांपर्यंत राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
मार्च महिन्याच्या अखेरीपासून देशामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे सर्वच आर्थिक उलाढाली ठप्प झाल्यामुळे यावेळी अर्थसंकल्पीय तूट मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती या अहवालामध्ये व्यक्त झाली आहे. सोमवार (दि. ३१ रोजी) आर्थिक तुटीबाबतची आकडेवारी जाहीर होणार आहे.

Web Title: Budget deficit likely to reach 7%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.