रपया मजबुतीसाठी प्रयत्न व्हावेतअर्थव्यवस्था रुळावर आणावी चार्टर्डअकाऊंटंट, कर सल्लागारांच्या प्रतिक्रियाऔरंगाबाद : सत्ता सांभाळून एक महिना पूर्ण झालेल्या नवीन केंद्र सरकारकडून मोठी अपेक्षा व्यक्त करणे घाईचे ठरेल, असे मत शहरातील चार्टर्ड अकाऊंटंट व कर सल्लागारांनी व्यक्त केले. मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत व्हावा व आपली अर्थव्यवस्था रुळावर आणावी, अशी किमान अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.केंद्रीय अर्थसंकल्पाची तारीख जसजसी जवळ येत आहे. तसतशी नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. प्रत्येक क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. शहरातील चार्टर्ड अकाऊंटंट व कर सल्लागारांचे तर सरकारच्या प्रत्येक आर्थिक निर्णयाकडे लक्ष असते. नवीन सरकारकडून सर्वांना अपेक्षा आहे; पण एका रात्रीतून चमत्कार होणार नाही हे सत्य सर्वांनी समजून घ्यावे, असा मत सी.एं.नी व्यक्त केले. इन्स्टट्यिूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियाचे पश्चिम विभागाचे कोषाध्यक्ष सी.ए. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले की, इन्कम टॅक्टमध्ये टीडीएसची समस्या खूप गंभीर बनली आहे. लाखो करदात्यांना मागील ४ वर्षांपासून टीडीएस मिळाला नाही. पेनॉल्टी पडली आहे. या प्रकरणी ६ न्यायालयांत याचिका दाखल आहेत. टीडीएसच्या प्रकरणांचा लवकर निपटारा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात यावी. काही को-ऑप. बँकांकडे इंडियन फायनान्सियल सिस्टीम कोर्ड नंबर नाही. तो दिल्यानंतरच इन्कम टॅक्स रिर्टन भरता येतो. लहान बँकेकडेच कोर्ड नंबर नसल्याने रिटर्न भरण्यात अडचणी येत आहेत. सी.ए. संघटनेचे अध्यक्ष सी.ए. विजय राठी म्हणाले की, इन्कम टॅक्सची मर्यादा २ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढविण्यात यावी. गुडस् अँड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) व डायरेक्ट टॅक्स कोड (बीपीसी)ची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी. सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी या नवीन करप्रणालीची अंमलबजावणी करण्यात यावी. जीवनावश्यक वस्तू व जीवनरक्षक औषधीवरील एक्साईज कमी करण्यात यावी. सी.ए. पंकज कलंत्री यांनी सांगितले की, नवीन सरकारकडून जास्त अपेक्षा करणे घाईचे ठरेल. मागील दोन वर्षांपासून डॉलरच्या तुलनेत रुपया खूप कमजोर झाला आहे. रुपया मजबूत करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुढील वर्षभरात आर्थिक स्थिती रुळावर आणण्याचे महत्त्वाचे काम सरकारला करावे लागेल. (जोड)
अर्थसंकल्प : प्रतिक्रिया
रुपया मजबुतीसाठी प्रयत्न व्हावेत
By admin | Published: July 4, 2014 09:45 PM2014-07-04T21:45:12+5:302014-07-04T21:45:12+5:30