Join us

Budget : मनमोहन सिंग यांचं ते 'Epochal' बजेट, ज्यानं बदलली देशाची दिशा; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 3:00 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै २०२४ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह ६ अर्थसंकल्प सादर केले असून आता त्या सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Budget : अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै २०२४ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह ६ अर्थसंकल्प सादर केले असून आता त्या सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प या अपेक्षांवर कितपत खरा उतरेल हे २३ जुलैला कळेल, पण अर्थसंकल्पाशी संबंधित काही रंजक नावे आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. असेच एक नाव म्हणजे Epochal. कोणत्या अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आणि त्या अर्थसंकल्पाला हे नाव का देण्यात आलं, हे जाणून घेऊया.

१९९१ चा अर्थसंकल्प

१९९१ मध्ये काँग्रेसचे पीव्ही नरसिंह राव यांचं सरकार होतं. या सरकारमध्ये अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग होते. आर्थिक उदारीकरणाच्या युगाची सुरुवात करणारा आणि लायसन्स राज संपुष्टात आणणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प त्यांनी त्यावेळी सादर केला. भारत आर्थिक पतनाच्या उंबरठ्यावर असताना हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्याअंतर्गत अनेक महत्त्वाची पावलx उचलण्यात आली. उदाहरणार्थ, सीमा शुल्क २२० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्यात आलं. त्याचबरोबर निर्यातीला चालना देण्यासाठी ही अनेक कठोर पावलं उचलली गेली.

सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार सीतारामन

निर्मला सीतारामन २३ जुलैला सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासह त्या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाशी बरोबरी करतील. निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत, ज्यांनी जुलै २०१९ पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी १० वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. अंतरिम अर्थसंकल्पासह सलग सहा वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.

टॅग्स :अर्थसंकल्प 2024मनमोहन सिंग