Lokmat Money > बिझनेस न्यूज > कमी बजेटमध्येही करा राजेशाही थाटात विवाह! फक्त 'या' टीप्स फॉलो करा, लोकं नुसते पाहत राहतील

कमी बजेटमध्येही करा राजेशाही थाटात विवाह! फक्त 'या' टीप्स फॉलो करा, लोकं नुसते पाहत राहतील

Saving Tips : आजपासून देशभरात लगीनसराईचा हंगाम सुरू झाला आहे. थोडं डोकं लावलं तर मर्यादित खर्चातही एक अविस्मरणीय विवाह सोहळा आयोजित करता येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 02:30 PM2024-11-12T14:30:02+5:302024-11-12T14:31:19+5:30

Saving Tips : आजपासून देशभरात लगीनसराईचा हंगाम सुरू झाला आहे. थोडं डोकं लावलं तर मर्यादित खर्चातही एक अविस्मरणीय विवाह सोहळा आयोजित करता येतो.

budget wedding hacks to save money | कमी बजेटमध्येही करा राजेशाही थाटात विवाह! फक्त 'या' टीप्स फॉलो करा, लोकं नुसते पाहत राहतील

कमी बजेटमध्येही करा राजेशाही थाटात विवाह! फक्त 'या' टीप्स फॉलो करा, लोकं नुसते पाहत राहतील

Saving Tips : आजपासून देशभरात लगीनसराई सुरू झाली आहे. विवाह हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाला आपला लग्न धुमधडाक्यात करण्याची इच्छा असते. गेल्या काही वर्षात तर राजेशाही पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण, महागाईच्या काळात लग्नाचे बजेट गगनाला भिडू लागले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी दोन-तीन लाखांतही चांगला विवाह होऊ शकत होता. पण, आजकाल साधारण लग्नालाही किमान १०-१२ लाख रुपये खर्च होतात. एखादा चांगला आणि दर्जेदार कार्यक्रम आयोजित केला तर २५ ते ३० लाख रुपये आरामात जातात. अशा परिस्थितीत मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर मोठा पेच निर्माण होतो. पण, थोडे शहाणपण आणि दूरदृष्टी वापरली तर मर्यादित खर्चातही एक अविस्मरणीय विवाह सोहळा आयोजित करता येतो.

महागडे विवाहस्थळ
शहरातील प्राइम लोकेशन्सवर असलेले हॉल किंवा हॉटेल्स खूप महाग असतात. त्याऐवजी, जर तुम्ही नवीन मॅरेज गार्डन, फार्म हाऊस किंवा शहराबाहेर एखादे ठिकाण निवडले तर तुम्ही ५० टक्के बचत करू शकता. अनेक हॉटेल्स शनिवार किंवा रविवारी वीकेंडला जास्त शुल्क आकारतात, तर आठवड्याच्या दिवशी ते २०-३० टक्क्यांपर्यंत सूट देतात. तुम्ही या पर्याय वापरू शकता.

लग्नपत्रिका
आजकाल लग्नपत्रिका ५० रुपयांपासून हजारो रुपयांना मिळतात. जर तुम्हाला ४०० कार्ड छापायचे झाले तर यासाठी ३० हजार रुपयांपासून काही लाख रुपये खर्च करावे लागतील. आजकाल, लोक पर्याय म्हणून ई-मेल, एसएमएस आणि व्हिडिओ (डिजिटल) कार्ड वापरत आहेत. तुम्ही घरबसल्या काही तासांत प्रत्येकाला डिजिटल कार्ड पाठवू शकता. फारच आवश्यक असेल तर अगदी जवळच्या नातेवाईकांसाठी १०० पत्रिका छापून घ्या.

जेवणावर खर्च नियंत्रित करा
आजकाल अनेक लग्नात जेवणावर मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी पाहायला मिळते. बहुतांश लोक लग्नकार्यात मर्यादित प्रमाणात जेवतात. त्यातही अनेकांना विविध जुनाट आजारांमुळे (मधुमेह, फॅटी लिव्हर, पित्त, गॅस-अपचन) साधी डाळ, तांदूळ, चपाती आणि भाज्यांसोबत एखादं स्वीट क्वचितच घेतात. त्यामुळे अन्नपदार्थ मर्यादित ठेवा.

अतिथींच्या संख्येवर मर्यादा
लग्न रोज होत नाही, हे खरे असले तरी नातेवाईक आणि जवळच्या मित्रमैत्रीनींनाच आमंत्रित करणे आवश्यक आहे. या महागाईच्या युगात आपण भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला आमंत्रित करू शकत नाही. तुमच्या अगदी जवळचे नातेवाईक, मित्र, काम करत असलेल्या ठिकाणचे सहकारी आणि दोन-चार शेजाऱ्यांना आमंत्रित करू शकता.

सजावटीवर मर्यादित खर्च
लग्न समारंभात जास्त थाटामाटात आणि महागडी सजावट करण्याची गरज नाही. अनेकदा साधी सजावटही रॉयल लूक देते. सजावटीमध्ये खऱ्या फुलांचा वापर कमीत कमी करा. त्याऐवजी कृत्रिम फुले, रंगीबेरंगी कपडे इत्यादी वापरा. म्हणजे तुम्हाला जास्त खर्च येणार नाही.

फोटोग्राफर ओळखीचा शोधा
सुप्रसिद्ध फोटोग्राफर अनेकदा महाग असतात. त्याच्याऐवजी, तुम्ही नवीन फोटोग्राफर निवडू शकता. जो फारसा लोकप्रिय नसला तरी त्याचे काम चांगले आहे. यासाठी तुम्ही तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून चौकशी करू शकता.

लग्नाचे कपडे आणि दागिने
तुम्ही वधू-वराचा ड्रेस ऑर्डर देऊन तयार करुन घेऊ शकता. ते पुन्हा विकताही येतात. किंवा आजकाल चांगल्या प्रकारचे कपडे रेंटवर सहज मिळतात. तसेच दागिने विकत घेण्याऐवजी भाड्याने घेऊ शकता. यामध्ये तुमचे हजारो रुपये सहज वाचतील.

डायरीत सर्व हिशोब ठेवा
तुम्ही लग्नासाठी ठरवलेल्या निधीचा संपूर्ण हिशेब एका डायरीत लिहा. तसेच लोकांना दिलेली आगाऊ रक्कम किंवा पेमेंट पावत्या फाईलमध्ये ठेवा. यामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही तयार केलेल्या आर्थिक नियोजनावर ठाम राहून काम केलं तर तुमची लग्नात ५० टक्क्यांपेक्षा जास्त रक्मक नक्कीच वाचेल.

Web Title: budget wedding hacks to save money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.