Lokmat Money > बिझनेस न्यूज > अर्थसंकल्पाने आणला शेअर बाजारात उत्साह

अर्थसंकल्पाने आणला शेअर बाजारात उत्साह

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये बाजाराला अपेक्षित असलेल्या अनेक घोषणा असल्यामुळे बाजाराने अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत करीत सुमारे ५०० अंशांची उसळी घेतली.

By admin | Published: February 6, 2017 12:21 AM2017-02-06T00:21:54+5:302017-02-06T00:21:54+5:30

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये बाजाराला अपेक्षित असलेल्या अनेक घोषणा असल्यामुळे बाजाराने अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत करीत सुमारे ५०० अंशांची उसळी घेतली.

Budgeting enthused by the stock market | अर्थसंकल्पाने आणला शेअर बाजारात उत्साह

अर्थसंकल्पाने आणला शेअर बाजारात उत्साह

शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशी
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये बाजाराला अपेक्षित असलेल्या अनेक घोषणा असल्यामुळे बाजाराने अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत करीत सुमारे ५०० अंशांची उसळी घेतली. मात्र, त्यानंतरच्या जागतिक घडामोडींमुळे बाजाराचा वेग काहीसा मंदावला आहे. आगामी सप्ताहामधील काही घडामोडींवर बाजाराची नजर असणार आहे. त्यामुळेही वाढ मंदावली आहे. निफ्टीने गाठलेला ८७०० अंशांचा टप्पा निश्चितच आशादायक आहे.
मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताहात अर्थसंकल्पाच्या आधीचा दिवस वगळता तेजी होती. या सप्ताहामध्ये बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३५८.०६ अंशांनी वाढून २८२४०.५२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ९९.९५ अंशांनी म्हणजेच १.२ टक्क्यांनी वाढून ८७४०.९५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे क्षेत्रीय निर्देशांकही अनुक्रमे २.५ आणि २.४ टक्क्यांनी वाढून १३२८५.४१ आणि १३४२२.१० अंशांवर बंद झाले. बाजारातील जवळपास सर्वच निर्देशांक सप्ताहाच्या अखेरीस हिरव्या रंगात दिसून आले.
अर्थमंत्री जेटली यांनी गृहबांधणी क्षेत्राला दिलेल्या सवलती आणि जमीन, तसेच स्थावर मालमत्तेच्या दीर्घकालीन भांडवली नफ्याबाबतच्या बदललेल्या तरतुदी यांचा लाभ या क्षेत्रातील मंदी हटण्यास होईल. परकीय वित्तसंस्थांनीही गतसप्ताहामध्ये ५५५.१६ कोटी रुपयांची खरेदी केली.
अमेरिकेने व्हिसाबाबत घेतलेली भूमिका आणि तेथील परकीय नागरिकांच्या नोकऱ्यांबाबत अनिश्चिततेचे वातावरण असल्याने त्याचा फटका माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला. गतसप्ताहात अमेरिकन फेडरल रिझर्व्ह, बॅँक आॅफ जपान आणि बॅँक आॅफ इंग्लंडने व्याजदर कायम राखण्याची घोषणा केली. मात्र, चीनने व्याजदरात वाढ करून परकीय गुंतवणूक आकृष्ट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. भारतीय रिझर्व्ह बॅँक बुधवारी पतधोरण जाहीर करणार असून, त्यामध्ये व्याजदरामध्ये कपातीची अपेक्षा आहे.

Web Title: Budgeting enthused by the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.