- उमेश शर्मा, सीए
(करनिती - भाग २८५)
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, अलीकडेच रिअल इस्टेट उद्योगाच्या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहेत, यात बांधकाम व्यावसायिक आणि डेव्हलपर्सला रिव्हर्स चार्जद्वारे आरसीएम लागू करण्याच्या तरतुदी काय आहेत व त्यांना आरसीएम अंतर्गत कर भरावा लागतो का?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना होय, बिल्डर्स आणि डेव्हलपर्सला नवीन तरतुदीनुसार, ०१ एप्रिल, २०१९ पासून जीएसटी अंतर्गत आरसीएम भरावा लागेल.
अर्जुन: कृष्णा, आरसीएमच्या अंतर्गत बिल्डर/ डेव्हलपर्सने कर भरणे आवश्यक आहे का?
कृष्ण: अर्जुना, खालील तीन प्रकरणांमध्ये बांधकाम व्यावसायिक / डेव्हलपर्सला आरसीएम अंतर्गत कर भरावा लागेल - प्रमोटर (बिल्डर / डेव्हलपर्स) नोंदणीकृत पुरवठादाराकडूून कमीतकमी ८० टक्के खरेदी करण्यात अयशस्वी झाल्यास, ०१ एप्रिल, २०१९ रोजी किंवा त्यानंतर टीडीआर किंवा फ्लोर स्पेस निर्देशांक वर, अॅफोर्डेबल रेसिडेन्शल अपार्टमेंटच्या बांधकामाच्या संदर्भात कामांच्या कॉन्ट्रॅक्ट सेवांच्या खरेदीवर उद्भवणारे भिन्न कर, जर त्यात नमूद केलेल्या ५० टक्के मापदंडांची पूर्तता होत नसेल तर.
अर्जुन : कृष्णा, बांधकाम व्यावसायिक / डेव्हलपर्स वर नमूद केलेल्या ८० टक्केच्या सीमा मर्यादेची गणना कशी करावी?
कृष्ण : अर्जुना, खरेदी केलेल्या सर्व वस्तू आणि सेवा मिळविल्या जाणाऱ्या विकासाचे हक्क, दीर्घकालीन भाडे जमीन, फ्लोर स्पेस इंडेक्स किंवा वीजचे मूल्य, हाय स्पीड डीझेल, मोटर स्पिरिट आणि नैसर्गिक गॅसचा वापर करून सेवांचे मूल्य वगळता, निवासी बांधकामासाठी वापरल्या जाणाºया सर्व वस्तूंचा विचार केला जाईल.
अर्जुन: कृष्णा, जर नोंदणीकृत पुरवठादाराकडून खरेदीचे मूल्य ८० टक्केपेक्षा कमी असेल, तर अशा खरेदीवर जीएसटी दर काय लागू आहे?
कृष्ण: अर्जुना, प्रमोटर (बिल्डर/डेव्हलपर्स) कमी झालेल्या रकमेसाठी अशा सर्व प्रकारच्या पुरवठ्यावर रिव्हर्स चार्जच्या आधारे जीएसटी १८ टक्के भरावे लागेल. नोंदणीकृत व्यक्तीकडून खरेदी केलेले सीमेंटवरील कर दर २८ टक्के लागेल.
अर्जुन: कृष्णा, ८० टक्क्याची मर्यादा मोजण्यासाठी कोणत्या तारखेपर्यंत घेतलेला माल आणि सेवेचा विचार केला जाईल?
कृष्ण: अर्जुना, प्रकल्प वित्तीय वर्षाच्या दरम्यान पूर्ण झाला, तर पूर्ण होणारा प्रमाणपत्र जारी करण्याच्या तारखेपर्यंत किंवा प्रकल्पाच्या प्रथम व्यवहारापर्यंत खरेदी करता येईल, जे आधी असेल ते विचारात घेतले जाईल.
अर्जुन: कृष्णा, टीडीआरच्या बाबतीत कर केव्हा भरावा लागेल?
कृष्ण: अर्जुना, ०१ एप्रिल, २०१९ नंतर न विकलेल्या टीडीआरच्या पुरवठ्यावर बांधकाम व्यावसायिकांना/ डेव्हलपर्सना कर भरावा लागेल.
अर्जुन: कृष्णा, अॅफोर्डेबल रेसिडेन्शल अपार्टमेंटच्या बांधकामासाठी कामकाजाच्या कॉन्ट्रॅक्ट सेवेची खरेदी करण्यामध्ये आरसीएमची देयता काय आहे?
कृष्ण: अर्जुना, प्रकल्पाचे कार्पेट क्षेत्र अॅफोर्डेबल रेसिडेन्शल अपार्टमेंटसाठी ५० टक्क्यांवरून अधिक असेल आणि त्यासाठी प्रदान केलेल्या वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सेवेवर १२ टक्के दराने जीएसटी लागू केला जाईल. प्रकल्पाच्या अखेरीस ५० टक्के निकष पूर्ण न झाल्यास विकासकाला आरसीएम अंतर्गत भिन्न जीएसटी भरावा लागेल.
अर्जुन: कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण: अर्जुना, विविध अधिसूचना देऊन बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांसाठी सरकारने आउटपुट बाजूवर कराचे ओझे कमी केले आहे, परंतु इनपुट बाजू नियंत्रित केली गेली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि डेव्हलपर्सनी कोणत्याही करारामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्व कर संबंधी विचार करावा.