Lokmat Money > बिझनेस न्यूज > घर बांधणे झाले प्रचंड महाग! तीन वर्षांत स्टील १४१%, ॲल्युमिनियम १३६%, प्लास्टिक पाइप ११७% नी महागले

घर बांधणे झाले प्रचंड महाग! तीन वर्षांत स्टील १४१%, ॲल्युमिनियम १३६%, प्लास्टिक पाइप ११७% नी महागले

१००० चौरस फूट घराचे इंफ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी पूर्वी जे साहित्य वापरले जायचे त्यासाठी जवळपास ६ ते ७ लाख रुपयांचा खर्च येत होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 01:52 PM2022-04-23T13:52:22+5:302022-04-23T13:53:15+5:30

१००० चौरस फूट घराचे इंफ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी पूर्वी जे साहित्य वापरले जायचे त्यासाठी जवळपास ६ ते ७ लाख रुपयांचा खर्च येत होता. 

Building a house is hugely expensive! In three years, steel prices rose by 141%, aluminum by 136% and plastic pipes by 117%. | घर बांधणे झाले प्रचंड महाग! तीन वर्षांत स्टील १४१%, ॲल्युमिनियम १३६%, प्लास्टिक पाइप ११७% नी महागले

घर बांधणे झाले प्रचंड महाग! तीन वर्षांत स्टील १४१%, ॲल्युमिनियम १३६%, प्लास्टिक पाइप ११७% नी महागले

नवी दिल्ली : घर बांधणे सध्या प्रचंड महाग झाले आहे. तीन वर्षांत स्टील १४१ टक्क्यांनी, ॲल्युमिनियम १३६, वायर १०१ आणि प्लास्टिक पाइप ११७ टक्क्यांनी महागले आहे. कोणतेही ठोस कारण नसताना सिमेंट कारखानदारांनीही गोणीमागे ५० रुपयांनी वाढ केल्याने सिमेंटही ४२० रुपयांपर्यंत मिळत आहे. ५० ते ५५ रुपये किलोने मिळणाऱ्या लोखंडी सळया सध्या ७० ते ७५ रुपये किलोने विकल्या जात आहेत. याचा थेट फटका घरबांधणीला बसला आहे.
सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या विटांच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. एकाच वेळी सिमेंट, स्टील, वायरसह सर्वच वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने घर बांधण्याचा खर्चही वाढला आहे. तीन वर्षांपूर्वीपर्यंत सामान्य कंत्राटदार ७०० रुपये चौरस फूट (साहित्यासह) मध्ये घर बांधण्याचा ठेका घेत असे. मात्र
आता हा ठेका किमान १ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बहुतांश ठेकेदार यात आणखी वाढ करण्याची मागणी करत आहेत.

साहित्य तेच तरीही किंमत वाढली -
-  १००० चौरस फूट घराचे इंफ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी पूर्वी जे साहित्य वापरले जायचे त्यासाठी जवळपास ६ ते ७ लाख रुपयांचा खर्च येत होता. 
-  मात्र, आता हा खर्च १० लाख रुपये येत आहे. यामध्ये स्टील, सिमेंट, विटा, वाळू, लोखंडी ग्रील्स, नळ फिटिंग, फरशा यासह इतर कामांचा समावेश आहे. 
-  याशिवाय घरामध्ये पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस)चे काम करायचे असेल तर सुमारे १०० चौरस फुटांचा खर्च 
आणखी वाढतो. मजुरीचा खर्चही 
२ ते ३ पटीने वाढला आहे.

२०१९ पासून आतापर्यंत अशा वाढल्या किमती    (रुपये)
वस्तू                 २०१९     २०२०     २०२१     २०२२     महाग (टक्के)

स्टील (मे.टन)    ३३,१८०    ४०,३८०    ५७,०००    ८०,०००    १४१.११%
सिमेंट                १९०    २००    २५०    ३५०    ४१.११%
टाइल्स               ३२    ३२    ३९    ४३    ३४.३८%
पाइप                १२९    १२९    २०८    २८०    ११७.०५%
विंडो                 ४६०    ५००    ६१३    ६७५    ४६.७४%
ॲल्युमिनियम    १९०    १९०    ३१५    ४५०    १३६.८४%
(किलोग्रॅम)

कोणतेही ठोस कारण नसताना बांधकाम साहित्याच्या किमतीत वाढ केली जात आहे. विरोध केला तर काहीच होत नाही. सिमेंट असो की इतर मटेरियल, इंडस्ट्रीतील लोक सांगतात की वाढलेल्या भावानेच खरेदी करावी लागेल.
    - सूरज उपाध्याय, अध्यक्ष, मटेरियल असोसिएशन

सिमेंटच्या वाढत्या किमतीने प्रकल्प थांबणार
-  सिमेंटच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाल्याने त्याचा परिणाम आगामी प्रकल्पांवर होणार हे नक्की आहे. 
-  लोक किंमत कमी होण्याची वाट पाहतील. मात्र, यात नुकसान सर्वसामान्यांचेच होणार आहे.
 

Web Title: Building a house is hugely expensive! In three years, steel prices rose by 141%, aluminum by 136% and plastic pipes by 117%.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.