नवी दिल्ली : देशातील गृहबांधणी व पायाभूत क्षेत्राला चालना देण्यासाठी बहुप्रतिक्षित अशा ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ व ‘इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला सेबीने (सिक्युरिटी अँड एक्सेंज बोर्ड आॅफ इंडिया) हिरवा कंदीला दिला आहे. यामुळे तब्बल एक खर्व (एक ट्रिलियन) रुपयांच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
सेबीच्या संचालक मंडळाची आज येथे बैठक झाली, त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अधिसूचना येत्या महिनाभरात जारी करण्यात येणार आहे. तसेच आॅक्टोबर महिन्यापासून याच्या अंमलबजावणीचे संकेत सेबीने दिले आहेत. सेबीचे अध्यक्ष यु.के. सिन्हा यांनी सांगितले की, गृहबांधणी व पायाभूत सुविधा क्षेत्राला निधीची चणचण लाभू नये, व निधी उभारणी करताना, त्यात गुंतवणुकीचा वावही उपलब्ध व्हावा, या आकर्षक संकल्पनेवर या ट्रस्टमार्फत काम होणार असून या ट्रस्टची नोंदणी शेअर बाजारात एक कंपनी म्हणून करता येणार आहे. तूर्तास रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमधील गुंतवणुकीची किमान मर्यादा दोन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची गुंतवणुकीची किमान मर्यादा १० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.तूर्तास प्रतीक्षा करावी लागेल
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट फंडासाठी किमान दोन लाख तर इन्फ्रास्ट्रक्रच इन्व्हेस्टमेंट फंडासाठी किमान दहा लाख रुपयांची अट निश्चित करण्यात आली आहे. परंतु, भविष्यात किमान गुंतवणुकीची मर्यादा कमी करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. त्यामुळे तूर्तास सामान्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)
बांधकाम गुंतवणूक ट्रस्टला मंजुरी
देशातील गृहबांधणी व पायाभूत क्षेत्राला चालना देण्यासाठी बहुप्रतिक्षित अशा ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’
By admin | Published: August 11, 2014 02:03 AM2014-08-11T02:03:25+5:302014-08-11T02:03:25+5:30