Lokmat Money > बिझनेस न्यूज > BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?

BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?

BSE Share Price: बुधवारचा दिवस बीएसई लिमिटेडच्या शेअरसाठी (BSE Ltd Share Price) लाभदायक ठरल्याचं दिसून आलं. बीएसईच्या शेअर्समध्ये बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 03:47 PM2024-09-18T15:47:25+5:302024-09-18T15:48:46+5:30

BSE Share Price: बुधवारचा दिवस बीएसई लिमिटेडच्या शेअरसाठी (BSE Ltd Share Price) लाभदायक ठरल्याचं दिसून आलं. बीएसईच्या शेअर्समध्ये बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली.

Bull run in BSE limited stocks increase of more than 15 percent during the day What is the connection with NSE IPO | BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?

BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?

BSE Share Price: बुधवारचा दिवस बीएसई लिमिटेडच्या शेअरसाठी (BSE Ltd Share Price) लाभदायक ठरल्याचं दिसून आलं. बीएसईच्या शेअर्समध्ये बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. यासह शेअरने ५२ आठवड्यांची ३,९४५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. कामकाजाच्या अखेरिस शेअर १५.३१ टक्क्यांच्या वाढीसह ३८४४ रुपयांवर बंद झाला. गेल्या ४ दिवसांत या शेअरमध्ये जवळपास ३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गेल्या २ महिन्यांत यात ८० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र, अशा तेजीनंतर हा शेअर आता 'ओव्हरबॉट' झोनमध्ये आल्याचं टेक्निकल अॅनालिसिस्टचं म्हणणं आहे.

टेक्निकल चार्टनुसार, बीएसई शेअर्सचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) आता ८० वर पोहोचला आहे, यावरुन हा शेअर ओवरबॉट झोनमध्ये असल्याचे संकेत मिळतात. म्हणजेच तेजीनंतर आता त्यात करेक्शन किंवा नफावसुली दिसू शकते. मनी कंट्रोलनं दिलेल्या माहितीनुसार आनंद राठीचे जिगर पटेल यांच्या मते, शेअर्समध्ये सध्या तेजी असली तरी ३,३५० किंवा ३,३०० रुपयांच्या पातळीवर शेअर जाण्याची शक्यता आहे.

NSE च्या IPO शी कनेक्शन काय?

एनएसईचा (NSE) बहुप्रतीक्षित आयपीओ (IPO) येणार असल्यानं गुंतवणूकदारांच्या नजरा बीएसईच्या शेअर्सकडेही लागल्या आहेत. या आयपीओनंतर एनएसईला बीएसईवर लिस्ट करावं लागेल, ज्याचा फायदा बीएसईलाही होण्याची शक्यता आहे. बीएसईचे शेअर्स एनएसईवरही लिस्टेड आहेत.

अजून तेजी येईल का?

सध्याच्या स्थितीत खरेदी करण्यापेक्षा वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ओव्हरवॉट आणि तेजीनंतर करेक्शन येण्याची शक्यता पाहता गुंतवणूकदारांनी सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Bull run in BSE limited stocks increase of more than 15 percent during the day What is the connection with NSE IPO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.