लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दागिन्यांच्या निर्मितीचे देशातील सर्वात मोठे केंद्र असलेल्या कोलकत्यात २ वर्षांनंतर उत्साह परतला आहे. यंदा दागिन्यांचे नवे डिझाइन्स तर आहेतच ; पण त्याबरोबरच दागिने निर्मितीत ३ डी प्रिंटिंग व लेझर कटिंग यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दागिन्यांची मागणी २० टक्क्यांनी वाढली आहे.बाजारातील सूत्रांनी सांगितले की, यंदा कोलकत्याचे ज्वेलर्स व्हर्च्युअल ट्रायलचा पर्यायही ग्राहकांना देत आहेत. विदेशातील ग्राहकही कोणता दागिना आपल्याला शोभून दिसेल, हे याद्वारे पाहू शकतो. ऑक्टोबरपासून सुरू झालेला सणासुदीचा हंगाम फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालेल.
ओणम ते दिवाळी राहणार तेजीदक्षिण भारतात त्रिसूर हे सर्वांत मोठे दागिने निर्मितीचे केंद्र आहे. केरळमध्ये आजकाल रोज १ हजार किलो सोन्याची विक्री होत आहे. ७०० किलो सोने त्रिसूरच्या बाजारात विकले जाते. केरळमध्ये ओणमच्या मुहूर्तावर सराफा बाजारात तेजी सुरू होते. दिवाळीपर्यंत ती टिकते. यंदा दसऱ्याला त्रिसूर मधील सराफा बाजारातील विक्री ३० टक्क्यांनी वाढली.
आखाती देशांतून वाढली मागणीयंदा केरळात सौदी अरेबिया, कुवेत आणि यूएई इत्यादी खाडी देशातून दागिन्यांची मागणी वाढली आहे. मागील २ वर्षांत लग्न वगळता इतर दागिने खरेदी ८० टक्क्यांनी घटली होती.त्रिसूरमध्ये २ लाख कामगार त्रिसूरच्या सोने बाजारात ४० हजार कारागीर आहेत. ते दागिने घडवतात. संपूर्ण दागिने बाजारात २ लाख कामगार आहेत. गेल्या वर्षी हा आकडा अर्ध्यावर आला होता. यंदा तो पूर्ववत झाला आहे. केरळमध्ये दागिन्यांची ६ हजार दुकाने आहेत.
४०% घट कोरोना-१९ साथीच्या काळात झाली होती. n विदेशातून सोन्यापेक्षा हिरे आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांना अधिक मागणी आहे. n लग्नसराई सुरू झाल्यामुळे ब्रायडल ज्वेलरीची विक्रीही तेजीत आहे, असे सूत्रांनी सांगितले.