Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची आहे पण बजेट नाही? 30% पर्यंत मिळतेय बंपर सूट

वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची आहे पण बजेट नाही? 30% पर्यंत मिळतेय बंपर सूट

Discount On electronics and Vehicles : तुम्हाला वाहन किंवा इलेक्ट्रीक वस्तू घ्यायची असेल तर याहून मोठी संधी कदाचित पुन्हा मिळणार नाही. कारण, सध्या अनेक वस्तूंवर ३० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 09:35 AM2024-09-16T09:35:02+5:302024-09-16T09:55:31+5:30

Discount On electronics and Vehicles : तुम्हाला वाहन किंवा इलेक्ट्रीक वस्तू घ्यायची असेल तर याहून मोठी संधी कदाचित पुन्हा मिळणार नाही. कारण, सध्या अनेक वस्तूंवर ३० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.

bumper discount of up to 30 increased the sales of vehicles and electronic products | वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची आहे पण बजेट नाही? 30% पर्यंत मिळतेय बंपर सूट

वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची आहे पण बजेट नाही? 30% पर्यंत मिळतेय बंपर सूट

Discount On Electrics and Vehicles : राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. सणासुदीचे औचित्य साधून लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. तुम्हीही वाहन खरेदीचा विचार करत असाल तर याहून मोठी संधी मिळणार नाही. कारण, संध्या इलेक्ट्रीक आणि इतर वाहनांवर कंपन्यांकडून बंपर सूट देण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांत वाहने आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची मागणी कमी झाली होती. मात्र, सणासुदीच्या काळात बंपर सवलतींमुळे विक्रीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, गणेश चतुर्थी आणि ओणममुळे ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी वाढली आहे. ओणम, नवरात्री, दुर्गापूजा आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल आणि स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांना ३० टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत.

मारुती सुझुकीच्या बुकिंगमध्ये १०% वाढ
मारुती सुझुकीच्या वाहनांना ग्राहकांची कायम पसंती असते. मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंती मारुती सुझुकीच्या वाहनांना असते. माहितीनुसार, ओणमपूर्वी केरळमध्ये मारुती सुझुकीच्या बुकिंगमध्ये १० टक्के वाढ झाली आहे. तर गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अशीच परिस्थिती होती. ओणमच्या काळात दुचाकींच्या विक्रीत १५ ते १६ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. सणासुदीच्या काळात वाहनांची विक्री चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ५ महिन्यांतील सरासरी ३,३०,००० युनिट्सवरून १५ टक्क्यांनी वाढू शकते. त्याच वेळी, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ ते ८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

रेफ्रिजरेटरच्या विक्रीत १५% वाढ
ओणममध्ये फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरच्या विक्रीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी सिंगल डोअर रेफ्रिजरेटरच्या विक्रीत ६ ते ७ टक्क्यांनी घट झाली आहे. पूर्ण स्वयंचलित वॉशिंग मशीनच्या विक्रीत १२ ते १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनच्या विक्रीत ४ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात भारतात १० लाखांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यताही अहवालात नोंदवण्यात आली आहे. हॉटेल्स, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक, ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा (BFSI) आणि रिटेल क्षेत्रात या नोकऱ्या निर्माण होतील.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही मिळणार बंपर सूट
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ऑनलाईन प्लॅटफॉर्म अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांचे फेस्टीवल सिझन येत आहेत. दोन्ही कंपन्यांनी आपापल्या वेबसाईटवर याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही वस्तू घेण्याचा विचार करत असाल तर या डिल्स तुमचे पैसे नक्कीच वाचवू शकतात. अमेझॉन प्लॅटफॉर्मवर तर इलेक्ट्रीक वाहनाचीही विक्री होत आहे.

Web Title: bumper discount of up to 30 increased the sales of vehicles and electronic products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.