नवी दिल्ली - वॉलमार्टची मालकी असलेली प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने बुधवारी कर्मचारी भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की, ते एका वेगळ्या मार्केटप्लेस मॉडेल फ्लिपकार्ट एक्स्ट्रा चे सादरीकरण करत आहे. जेणेकरून वैयक्तिक, सर्व्हिस एजन्सी आणि टेक्निशियनांना कमाईची संधी प्राप्त करून दिली जाऊ शकेल. फ्लिपकार्ट एक्ट्रा अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यामाध्यमातून फ्लिपकार्ट इच्छुक व्यक्तींना एक सरळ आणि सोपा अनुभव प्रदान करून देणार आहे. (Bumper recruitment in Flipkart before Dussehra-Diwali, four thousand people will get jobs)
एका वक्तव्यात सांगण्यात आले की, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशननंतर उमेदवार वैयक्तिक विविध भूमिकांसाठी स्वत:ला ऑनबोर्ड करण्यास सक्षम ठरतील. ज्यामध्ये येणाऱ्या महिन्यांमध्ये डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हपासून सुरुवात होईल. त्यानंतर यामध्ये सर्विस पार्टनर किंवा टेक्निशियन सहभागी होतील. यामध्ये सांगण्यात आले की, नवा प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या सप्लाय चेनला मजबूत करण्यात मदत करेल. त्यामुळे पार्ट टाईम संधी उपलब्ध करता येतील.
फ्लिपकार्टकडून सांगण्यात आले की, फेस्टिव्ह सिझन आणि कंपनीच्या बिग बिलियन डेजपूर्वी लाँच झाल्याने देशभरातील हजारो इंडिव्ह्युजवल, टेक्निशियन आणि सर्व्हिस एजन्सींना डिलिव्हरी पार्टनरच्या रूपात अतिरिक्त काम आणि कमाईची संधी प्रदान करण्यात मदत मिळणार आहे. कंपनीचे लक्ष्य डिसेंबर २०२१ पर्यंत फ्लिपकार्ट एक्स्ट्राच्या माध्यमातून चार हजार पार्ट टाईम असोसिएट्सना जोडण्याचे आहे.
देशात फेस्टिव्ह सिझनची सुरुवात झाली आहे. यादरम्यान, फ्लिपकार्टने आपल्या बिग बिलियन डेज सेलच्या तारखेची घोषणा केली आहे. हा सेल ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तो १२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.