नवी दिल्लीः लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. व्यवसाय ठप्प असल्यानं कंपन्यांनीही अनेक नोकरदारांना कामावरून काढून टाकलं आहे. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. पण त्यातही सरकारनं अशा तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. तरुण सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या योग्यतेनुसार सरकारनं नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. बऱ्याचदा नोकऱ्यांच्या जाहिराती निघतात, पण त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती नसते.
अशा काही नोकऱ्यांसंदर्भात माहिती समोर आली आहे. आयटीबीपीमधील जीडी कॉन्स्टेबल पदे रिक्त आहेत. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपी)मधील स्पोर्ट्स कोट्यांअंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ग्रुप सी पदासाठी भरती करण्यात आली आहे. टपाल विभाग, बँक, एअर इंडियासह अनेक सरकारी विभागांमध्ये भरती लवकरच सुरू होणार आहे. भारतीय टपाल विभागात भरती सुरू असून, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. या पदांवर नोकरी मिळविण्यासाठी ते अर्ज करू शकतात. हरियाणा पोस्टल विभागातही भरती केली जात आहे.
तसेच राजस्थान लोकसेवा आयोगाने (आरपीएससी) सहाय्यक सांख्यिकी अधिकारीपदासाठी अर्ज मागविले आहेत. पदांसाठी अर्ज करण्याची तारीख 10 जुलै 2020 ते 10 ऑगस्ट 2020पर्यंत आहे. अरुणाचल प्रदेश लोकसेवा आयोग (एपीपीएससी) अनेक पदांवर भरती करणार आहे. विभाग अधिकारी (गट-ब) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार 31 जुलै 2020 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. दीनदयाल पोर्ट ट्रस्ट भरती काढली असून, दीनदयाल पोर्ट ट्रस्टने (डीपीटी) विविध रिक्त पदांवर नियुक्तीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार 07 जुलै 2020 पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
हेही वाचा
चीनच्या अडचणी वाढल्या; जिनपिंग सरकारविरोधात मुस्लिम थेट आंतरराष्ट्रीय कोर्टात
CoronaVirus: नवरी नटली; सुपारी फुटली अन् वराती मंडळींना ५० हजार दंडाची रक्कम भरावी लागली
मोठी बातमी! बँकेत अन् पोस्टात FD आहे? मग आजच जमा करा 'हे' दोन फॉर्म अन्यथा होणार मोठे नुकसान
India China FaceOff: चीनशी युद्ध झाल्यास भारतासोबत अमेरिकेची सेनाही लढणार, व्हाइट हाऊसची मोठी घोषणा
जगात टाळेबंदी; पोस्टात मिळतेय नोकरीची सुवर्णसंधी; 10वी पास असलेल्यांनी आजच अर्ज करा
चीनला घेरलं! दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेनं पाठवल्या दोन घातक विमानवाहू युद्धनौका