Join us  

Air India Recruitment : टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये बंपर भरती, वेतन वादादरम्यान १ हजार लोकांना मिळणार नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 5:13 PM

टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडिया मोठ्या प्रमाणावर भरती सुरू करण्याच्या तयारीत आहे.

टाटा समूहाची (Tata Group) विमान कंपनी एअर इंडिया (Air India) मोठ्या प्रमाणावर भरती सुरू करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी, केवळ मुलाखतीच्या आधारे 495 पदांची भरती करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. आता कंपनी 1000 हून अधिक वैमानिकांची भरती करणार आहे. यामध्ये कॅप्टन आणि ट्रेनर्स दोघांचाही समावेश आहे. टाटा समूह आपल्या ताफ्याचा आणि नेटवर्कचा विस्तार करत आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे. सध्या या विमान कंपनीत 1800 हून अधिक पायलट्स कार्यरत आहेत. आता गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, वैमानिकांच्या संख्येनुसार एक हजारांहून अधिक वाढण्याची शक्यता आहे.

टाटा समूहाच्या या कंपनीनं बोईंग आणि एअरबससह 470 विमानांची ऑर्डर दिली आहे. एअरबसला दिलेल्या ऑर्डरमध्ये 210 A320/321 Neo/XLR आणि 40 A350-900/1000 चा समावेश आहे. याशिवाय कंपनीनं बोइंगला 190 737-मॅक्स, 20 787 आणि 10 777 ची ऑर्डर दिली आहे. एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या ताफ्यात 500 हून अधिक विमानांचा समावेश होणार आहे. यामुळे ते आपल्या A320, B777, B787 आणि B737 च्या ताफ्यासाठी कॅप्टन, फर्स्ट ऑफिसर आणि ट्रेनर्सची भरती करत आहे.

वादादरम्यान भरतीएअर इंडिया अशा वेळी वैमानिकांची भरती करत आहे जेव्हा त्यांच्या विद्यमान वैमानिकांनी सॅलरी स्ट्रक्चर आणि सेवा शर्तींबाबत कंपनीच्या अलीकडील निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. एअर इंडियानं 17 एप्रिल रोजी पायलट आणि केबिन क्रूसाठी नवीन सॅलरी स्ट्रक्चर सादर केलं. इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन (ICPA) आणि इंडियन पायलट गिल्ड (IPG) या दोन पायलट युनियननं त्यास नकार दिला आहे.

ते कामगार कायद्यांचं उल्लंघन करतं आणि तयार करण्यापूर्वी त्यांचा सल्ला घेतला गेला नसल्याचं युनियनचा आरोप आहे. एअर इंडियाच्या 1500 हून अधिक वैमानिकांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिलं आहे.

टॅग्स :टाटानोकरीएअर इंडिया