Adani Shares: गेल्या एका वर्षात सेन्सेक्स सुमारे 7 टक्क्यांनी वाढला आहे, तर निफ्टीनेही 7 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. याच वर्षात अदानी ग्रुपच्या 3 कंपन्यांनी गुंतवणुकदारांची चांदी केलीये. या तीन कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना 500% रिटर्न्स दिले आहेत. गेल्या एका वर्षात अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांच्या शेअर्सनी प्रचंड पैसा कमावला आहे.
अदानी पॉवर - अदानी पॉवरचे शेअर्स गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर स्टॉक सिद्ध झाले आहे. हा स्टॉक सध्या 338 रुपयांचा आहे, परंतु त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक 70.35 रुपये आणि 52 आठवड्यांचा उच्चांक 354 रुपये आहे. म्हणजेच या स्टॉकने एका वर्षात 5 पट परतावा दिला आहे.
अदानी टोटल गॅस - गेल्या एका वर्षात अदानी गॅसचे शेअर्स 843 रुपयांवरून 3,353 रुपयांपर्यंत वाढले आहेत. परताव्याच्या बाबतीत, अदानी समूहाच्या या शेअरने एका वर्षात 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच, स्टॉकने 4 पट पैसे कमावले आहेत.
अदानी ट्रान्समिशन - अदानी ट्रान्समिशनच्या स्टॉकनेही गेल्या एका वर्षात सुमारे 400 टक्के परतावा दिला आहे. अदानी ट्रान्समिशनच्या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 900 रुपये आहे आणि सध्या या शेअरची किंमत 3512 रुपये आहे. एखाद्या व्यक्तीने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर ती गुंतवणूक आता 4 लाख रुपये झाली असती.
गौतम अदानींची चांदी
याशिवाय अदानी ग्रुप, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मर आणि अदानी पोर्टच्या इतर कंपन्यांनीही उत्कृष्ट परतावा दिला आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या तेजीमुळे गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या गौतम हे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत, तर ते आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.