Lokmat Money > बिझनेस न्यूज > म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे ५ गोल्डन नियम; बाजार कोसळला तरी होईल अधिक फायदा

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे ५ गोल्डन नियम; बाजार कोसळला तरी होईल अधिक फायदा

Mutual Fund Investment : म्युच्युअल फंड गुंतवणूक केवळ बाजारातील जोखमीपासून तुमचे संरक्षण करत नाही तर तुम्हाला उत्कृष्ट परतावा देखील देतो. मात्र, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही ५ गोल्डन नियम पाळले पाहिजेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 01:57 PM2024-10-28T13:57:58+5:302024-10-28T13:59:42+5:30

Mutual Fund Investment : म्युच्युअल फंड गुंतवणूक केवळ बाजारातील जोखमीपासून तुमचे संरक्षण करत नाही तर तुम्हाला उत्कृष्ट परतावा देखील देतो. मात्र, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही ५ गोल्डन नियम पाळले पाहिजेत.

bumper returns on mutual fund investment then remember these 5 principles of sip | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे ५ गोल्डन नियम; बाजार कोसळला तरी होईल अधिक फायदा

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे ५ गोल्डन नियम; बाजार कोसळला तरी होईल अधिक फायदा

Mutual Fund Investment : गेल्या ४ आठव्यांपासून सतत कोसळणाऱ्या शेअर बाजारात आज चांगली वाढ झाली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून बाजारात मोठं करेक्शन देखील आहे. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही चांगल्या फंडात नवीन SIP सुरू करू शकता किंवा आधीपासून चालू असलेल्या फंडात एकरकमी गुंतवणूक करू शकता. तुम्ही योग्य रणनितीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर तुम्हाला अधिक परतावा मिळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. यासाठी तुम्हाला ५ गोल्डन नियम पाळावे लागतील. 

SIP लवकर सुरू करा
एसआयपीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे चक्रवाढीची जादू. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितका लवकर तुमचा पैसा वाढण्यास मदत होईल. अशा प्रकारे तुम्ही छोट्या गुंतवणुकीतही मोठा पैसा जमा कराल.

योग्य फंड निवडा
सर्व म्युच्युअल फंड सारखे नसतात. मागील कामगिरी, खर्चाचे प्रमाण आणि फंड मॅनेजरचे कौशल्य यावर आधारित विविध फंडांचा अभ्यास करा. तुमच्या जोखीम आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांशी जुळणारे फंड विचारात घ्या. मग ते इक्विटी, डेट किंवा हायब्रिड फंड असे कोणतेही असू शकतात.

पोर्टफोलिओचा आढावा घेत राहा
गुंतवणुकीला विसरण्याची सवय लावू नका. तुमच्या SIP पोर्टफोलिओचा नियमितपणे आढावा घेत राहा. हे तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बदल करण्यास मदत करेल. सतत त्यांच्या बेंचमार्कपेक्षा जास्त कामगिरी करणारे फंड शोधा आणि तुमची विद्यमान गुंतवणूक कमी कामगिरी करत असल्यास, फंडातून बाहेर पडा आणि दुसऱ्यामध्ये गुंतवणूक करा.

गुंतवणुकीतील शिस्त
बाजारातील चढउतार अस्वस्थ करणारे असू शकतात. परंतु, गुंतवणुकीतील शिस्त ही SIP च्या यशाची गुरुकिल्ली आहे. बाजारातील घसरणीदरम्यान तुमची गुंतवणूक चालू ठेवल्याने तुम्हाला कमी किमतीत अधिक युनिट्स खरेदी करता येतात, कालांतराने तुमच्या खरेदी खर्चाची सरासरी काढता येते.

SIP ची रक्कम हळूहळू वाढवा
तुमचे उत्पन्न वाढत असल्यास तुमची SIP रक्कम वाढविण्याचा विचार करा. हा स्टेप-अप दृष्टीकोन तुम्हाला म्युच्युअल फंडांच्या संभाव्यतेचा फायदा घेण्यास मदत करू शकतो. तसेच तुमची गुंतवणूक महागाई आणि तुमच्या वाढत्या आर्थिक उद्दिष्टांच्या बरोबरीने राहते.

Web Title: bumper returns on mutual fund investment then remember these 5 principles of sip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.