Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशासाठी तुमच्यावर खर्चाचा भार; खिसा झाला खाली, तर भरेल तिजोरी

देशासाठी तुमच्यावर खर्चाचा भार; खिसा झाला खाली, तर भरेल तिजोरी

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बाजार फुलू लागला आहे. मागणीत वाढ होऊ लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 07:29 AM2021-10-07T07:29:19+5:302021-10-07T07:29:39+5:30

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बाजार फुलू लागला आहे. मागणीत वाढ होऊ लागली आहे.

The burden of expenses on you for the country, article on economy growth | देशासाठी तुमच्यावर खर्चाचा भार; खिसा झाला खाली, तर भरेल तिजोरी

देशासाठी तुमच्यावर खर्चाचा भार; खिसा झाला खाली, तर भरेल तिजोरी

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय अर्थव्यवस्था मरगळलेली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पतमानांकनातही घट झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेची वाटचाल जोमाने सुरू झाली आहे. याला कारणीभूत कोरोनाकालीन निर्बंधांमध्ये आलेली शिथिलता आणि लसीकरणाचा वाढलेला वेग हे दोन मुख्य घटक.

आधी काय होते चित्र?
मागील वर्षी कोरोनाने देशात हाहा:कार माजवला होता. टाळेबंदीमुळे उद्योग ठप्प झाले होते. त्यामुळे मूडीजने भारताचे पतमानांकन घटवले होते. मात्र, आता परिस्थिती सुधारली असून गेल्याच महिन्यात मूडीजने भारताचे पतमानांकन वाढवले आहे. कोरोना नियमही शिथिल करण्यात आल्याने अर्थव्यवस्थेचे चाक फिरू लागले.

मागणी वाढल्याने वाटचाल जोमाने...
कोरोनानंतर सर्वच क्षेत्रातील मागणीत झालेली वाढ अर्थव्यवस्थेत दिसू लागली आहे.  गतवर्षी मरगळलेली भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा जोमाने वाटचाल करू लागली आहे. 

कोरोना नियम शिथिल झाल्यानंतर...
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बाजार फुलू लागला आहे. मागणीत वाढ होऊ लागली आहे. वैयक्तिक कर्जाचे प्रमाण ऑगस्टमध्ये १२ टक्के होते. तर पेट्रोलचा खप १३ टक्क्यांनी वाढला. सर्व विमानतळांवर प्रवाशांची संख्या १३१ टक्क्यांनी वाढली. रोजगाराचे प्रमाण वाढू लागले आहे. उद्योगांकडून कर्जाची मागणी वाढू लागली. रेल्वेची मालवाहतूक २० टक्क्यांनी वाढली. आयात ५१ टक्क्यांनी तर निर्यात ४५ टक्क्यांनी वाढली.

खिसा झाला खाली, तर भरेल तिजोरी

  • आम जनता प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेची मुख्य घटक असते.
  • जनतेकडून जेवढ्या प्रमाणात वस्तूंची मागणी वाढेल, तेवढी ती 
  • अर्थव्यवस्थेसाठी पोषक असते.
  • मागणी वाढली म्हणजे पुरवठा वाढतो. पुरवठा वाढला म्हणजे उत्पादन वाढते, असे गणित आहे.

Web Title: The burden of expenses on you for the country, article on economy growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.