Lokmat Money > बिझनेस न्यूज > एका ऑफरमुळे बर्गर किंग अवघ्या ९ दिवसात बनला ब्रँड! मॅकडोनाल्डला फोडला होता घाम

एका ऑफरमुळे बर्गर किंग अवघ्या ९ दिवसात बनला ब्रँड! मॅकडोनाल्डला फोडला होता घाम

Burger King Creative Promotion : बर्गर किंगने एका कँपेनच्या जोरादार केवळ नवीन ब्रँड प्रस्थापित केला नाही. तर मॅकडोनाल्ड्स सारख्या मोठ्या खेळाडूला हादरा दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 05:07 PM2024-10-17T17:07:48+5:302024-10-17T17:08:47+5:30

Burger King Creative Promotion : बर्गर किंगने एका कँपेनच्या जोरादार केवळ नवीन ब्रँड प्रस्थापित केला नाही. तर मॅकडोनाल्ड्स सारख्या मोठ्या खेळाडूला हादरा दिला.

burger king creative promotion 1 cent whopper offer help take on mcdonalds | एका ऑफरमुळे बर्गर किंग अवघ्या ९ दिवसात बनला ब्रँड! मॅकडोनाल्डला फोडला होता घाम

एका ऑफरमुळे बर्गर किंग अवघ्या ९ दिवसात बनला ब्रँड! मॅकडोनाल्डला फोडला होता घाम

Burger King Creative Promotion :व्यवसाय क्षेत्रात मार्केटींग अर्थात जाहिरातीला अनन्य साधारण महत्त्व आहे. योग्य मार्केटींग केलं तर सामान्य प्रॉडक्टही ब्रँड व्हायला वेळ लागत नाही. याउलट हे चुकलं तर ब्रँडचाही कचरा होतो. टाटा कंपनीची नॅनो कार याचं उत्तम उदाहरण आहे. चुकीच्या कँपेनमुळे नॅनो कारचा प्रकल्प बंद करण्याची वेळ आली. कार्पोरेट क्षेत्रात अशाच एका जाहिरातीने जगभरात प्रसिद्ध असलेल्या एका मोठ्या ब्रँडचा बाजार उठवला होता. बर्गर किंगने २०१८ मध्ये फास्ट फूडच्या जगात खळबळ उडवून दिली होती. एका साध्या कँपेनने मॅकडोनाल्ड सारख्या मजबूत व्यवसायाला हादरा बसला.

गेमचेंजर कँपेन
बर्गर किंगने व्हॉपर बर्गर फक्त १ सेंटला (सुमारे ०.८३ रुपये) देण्याची आकर्षक ऑफर आणली होती. पण, यामागे एक अट ठेवली. ही अट नंतर गेम चेंजर ठरली. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बर्गर किंग ॲपचा वापर करावा लागेल. कोणत्याही मॅकडोनाल्ड आउटलेटच्या ६०० फुटांच्या आतमध्ये असतानाच हा बर्गड ऑर्डर करायचा होता. म्हणजे मॅकडोनाल्डजवळ उभे राहा आणि बर्गर किंगकडून फक्त ८३ पैशांमध्ये व्हॉपर ऑर्डर करा. त्यावेळी बर्गर किंगचे आउटलेट हे मॅकडोनाल्डच्या तुलनेत निम्मेच होते. शिवाय शोधायलाही कष्ट पडत होते. याउलट मॅकडोनाल्ड सर्वांना परिचित असल्याने लगेच ग्राहक तिथपर्यंत पोहचत. या कँपेनद्वारे बर्गर किंगने प्रतिस्पर्ध्याची ताकद आणि स्वत:च्या कमकुवतपणाचा शस्त्रासारखा वापर करून इतिहास घडवला.

तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांचा संगम
बर्गर किंगला ही स्ट्रॅटेजी लागू करण्यासाठी एक वर्ष लागले. कंपनीने मॅकडोनाल्डच्या सर्व १४,००० ठिकाणांचे जिओफेन्स केले. जेणेकरुन ग्राहक तिथेच आहे की नाही हे अ‍ॅपद्वारे कळू शकेल. ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी, बर्गर किंगने एक शक्तिशाली अ‍ॅप डेव्हलप केले. यामध्ये नेट ट्रॅफीक हाताळण्याची क्षमत होती. याशिवाय मोबाईलवरून ऑर्डर करण्याची सुविधाही त्यात जोडण्यात आली. ऑर्डर दिल्यानंतर ग्राहकाला बर्गर किंगचा पत्ता यावर दाखवला जात. जेणेकरुन आउटलेटला भेट देऊन ग्राहक बर्गर घेऊ शकेल. लोकांनाही ही क्रिएटिव्हिटी खूप आवडली. त्यांना कोणत्याही त्रासाशिवाय स्वस्त दरात बर्गर मिळत होते.

४ डिसेंबर २०१८ रोजी हे कँपेन सुरू करण्यात आले. ही ऑफर इतकी लोकप्रिय झाली की सोशल मीडियावरही याला प्रसिद्धी मिळाली. लोक मोठ्या प्रमाणात मॅकडोनाल्डमध्ये जाऊन बर्गर किंग ऑर्डर करू लागले. या कँपेनने लोकांना फक्त बर्गर विकले नाही तर बर्गर किंग नावाचा नवा ब्रँड प्रस्थापित झाला. अवघ्या ९ दिवस चाललेल्या या कँपेनने सर्व रेकॉर्ड तोडले. बर्गर किंग ॲप १.५ दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले. सोशल मीडियावर तर बर्गर किंग ट्रेंड करू लागला.
 

Web Title: burger king creative promotion 1 cent whopper offer help take on mcdonalds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.