Join us

महागाईची फोडणी; गतवर्षीच्या तुलनेत शाकाहार ५ टक्क्यांनी महागला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 6:21 AM

कांदे आणि टोमॅटोचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे ३५ टक्के आणि २० टक्के वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घरात बनणाऱ्या शाकाहारी थाळीच्या किमतीत जानेवारीमध्ये वार्षिक आधारावर म्हणजेच आदल्या वर्षाच्या तुलनेत ५ टक्के वाढ झाली आहे. ‘क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्स’ (एमआयअँडए) रिसर्चच्या वतीने बुधवारी केलेल्या एका अहवालानुसार, डाळ, तांदूळ, कांदा आणि टोमॅटो यांसारख्या वस्तू महाग झाल्यामुळे घरगुती शाकाहारी थाळी महाग झाली आहे. 

कांदे आणि टोमॅटोचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे ३५ टक्के आणि २० टक्के वाढले आहेत. थाळीच्या एकूण खर्चात १२ टक्के हिस्सेदारी असलेल्या तांदळाचे दर जानेवारीत १४ टक्के वाढले आहेत. ९ टक्के हिस्सेदारी असलेल्या डाळींचे भाव २१ टक्के वाढले आहेत. आदल्या महिन्याच्या तुलनेत मात्र कांदे व टोमॅटो अनुक्रमे २६ टक्के आणि १६ टक्के स्वस्त झाले आहेत. 

 

टॅग्स :भाज्यामहागाई