नवी दिल्ली : व्यवसायाच्या बाबतीत भारतातील स्थिती अधिक खुली व पारदर्शक आहे, तसेच भारताने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अमेरिकी राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ज्येष्ठ चिरंजीव डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी येथे केले.
प्रस्तावित ‘ट्रम्प टॉवर’च्या विक्रीसाठी भारतात आलेल्या ट्रम्प ज्युनिअर यांनी सांगितले की, व्यवसाय करण्यासंबंधीचे भारतातील वातावरण अमेरिकेतील वातावरणासारखेच आहे. एक व्यावसायिक या नात्याने मला वाटते की, येथील स्थिती अधिक खुली आहे. लोकांची मानसिकताही तशीच आहे. येथे प्रामाणिकपणा थोडासा अधिक आहे, असे मला जाणवते. आपल्या कंपनीने अमेरिकेबाहेर ‘अल्ट्रा लक्झरी’ अपार्टमेंट बांधण्यासाठी चीनआधी भारताची निवड का केली, असा प्रश्न विचारता, त्यांनी हे उत्तर दिले.
दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये ट्रम्प आॅर्गनायझेशनकडून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक विकासकांशी भागीदारी केली जात आहे. या प्रकल्पात एकूण २५४ अपार्टमेंट उभे करण्यात येणार असून, तेथील ३,५०० ते ४,५०० वर्ग फुटांच्या अपार्टमेंटची किंमत ५.५ कोटी ते ११ कोटी रुपये असेल. मार्च २०२३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार होईल.
ते म्हणाले की, माझ्या दृष्टीने भारतात व्यवसाय करणे अधिक सोपे आहे. आपल्या न्यूयॉर्कस्थित कंपनीसाठी भारत हे अमेरिकेबाहेरील सर्वांत मोठे मार्केट आहे. मी काही येथे नवखा नाही. गेल्या दशकातील बदल मी पाहिले आहेत.
भारतातील व्यावसायिक वातावरण चीनहून चांगले
व्यवसायाच्या बाबतीत भारतातील स्थिती अधिक खुली व पारदर्शक आहे, तसेच भारताने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 03:04 AM2018-02-21T03:04:37+5:302018-02-21T03:04:40+5:30