Join us

अब्जाधिशांच्या यादीत अदानी No.1, 2022 मध्ये वाढली सर्वाधिक संपत्ती; मस्क ते बिल गेट्स सर्वच पडले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 6:58 PM

यावर्षी अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 36 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ही वाढ जगभरातील अब्जाधिशांपैकी सर्वात जास्त आहे.

भारतीय अब्जाधीश गौतम अदानी या आठवड्यात बिल गेट्स यांची जागा घेत जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 113 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. जी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यापेक्षा 230 दशलक्ष डॉलर अधिक आहे.

यावर्षी अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 36 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ही वाढ जगभरातील अब्जाधिशांपैकी सर्वात जास्त आहे. महत्वाचे म्हणज, जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश एलन मस्क यांचादेखील अदानी यांच्यासमोर टिकाव लागत नाही. यावर्षी YTD मध्ये एलन मस्क यांचे 28.6 अब्ज डाॅलर्सचे नुकसान झाले आहे. 

ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी जग भरातील अब्जाधिशांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. यानंतर तिसऱ्या स्थानावर Bernard Arnault, दुसऱ्या स्थानावर Jeff Bezos आणि पहिल्या स्थानावर एलन मस्क आहेत. तर या यादीत मुकेश अंबानी 11 व्या स्थानावर गेले आहेत.

गेल्या 24 तासांत किती वाढली संपत्ती -ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, गेल्या 24 तासांत इलॉन मस्क यांच्या संपत्तीत 17.0 अब्ज डाॅलरची वाढ झाली. यानंतर Larry Ellison यांच्या संपत्तीत 2.87 अब्ज डॉलर्सची वाढ झआली. तिसऱ्या स्थानावर Bernard Arnault हे आहेत. यांच्या संपत्तीत 1.96 अब्ज डाॅलर्सची वाढ झाली आहे. Jeff Bezos यांच्या संपत्तीत 1.88 अब्ज डाॅलर्सची वाढ झाली आहे. यानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत 1.79 अब्ज डाॅलर्सची वाढ झाली आहे. 

टॅग्स :अदानीबिल गेटसएलन रीव्ह मस्कव्यवसाय