रोज सकाळी घरून नोकरीवर जाणे आणि सायंकाळी घरी येणे. आताच्या कोरोना काळात घरून का होईना, पण सकाळपासून सायंकाळपर्यंत काम करत राहणे. मात्र, आता याला कंटाळला असाल तर, आपला बिझनेस का सुरू करू नये? तोही असा बिझनेस, ज्यात गुंतवणूक कमी आणि कमाई बक्कळ असेल. असाच एक बिझनेस आहे अॅलोवेराचा (Elovera Business). याची मागणीही प्रचंड आहे आणि पैसेही अधिक मिळतात. हा बिझनेस आपण केवळ 50 हजार रुपयांतच सुरू करू शकता. (Business Idea: Business start with just Rs 50,000 and earn Rs 5 lakh)
कसा करावा अॅलोवेराचा बिझनेस?
अॅलोवेराचा वापर ब्यूटी प्रोडक्ट्स आणि खाद्य पदार्थांत होतो. याची मागणी केवळ भारतातच नाही, तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहे. अशात याच्या बिझनेसमधून लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते. हे दोन प्रकारे केले जाऊ शकते. पहिले म्हणजे, याची शेती करून आणि दुसरे म्हणजे, याच्या ज्यूस अथवा पावडरसाठी मशीन लावून. याची शेती आणि प्रोसेसिंग प्लांटसाठी वेगवेगळा खर्च येतो.
किती येतो खर्च? -
आपण अॅलोवेराची शेती करणार असाल, तर यासाठी आपल्याला केवळ 50 हजार रुपयांपर्यंत पैसे गुंतवावे लागतील. मात्र, आपल्याकडे शेती नसेल, तर आपल्याला ठोक्याने शेत घ्यावे लागेल. आपण अॅलोवेरा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना आणि बाजारात विकू शकता. मात्र, यावर आपल्याला आणखी नफा मिळवायचा असेल, तर आपण अॅलोवेराचे प्रोसेसिंग यूनिट लावून त्याचे जेल अथवा ज्यूस विकूनही मोठा नफा मिळवू शकता. प्रोसेसिंग प्लांटसाठी आपल्याला 3 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचा घर्च येऊ शकतो.
किती फायदा?
आपण अॅलोवेराची शेती करत असाल, तर 50-60 हजार रुपयांची गुंतवणूक करून 5-6 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवू शकता. तसेच आपण कमी गुंतवणुकीत हँड वॉश, सोप तयार करण्याचा उद्योगही सुरू करू शकता. कॉस्मॅटिक, मेडिकल, फार्मास्युटिकल सारख्या क्षेत्रात अॅलोवेराची मोठी मागणी आहे. तर अॅलोवेरा ज्यूस, लोशन, क्रिम, जेल, शॅम्पू या गोष्टींचीही बाजारात मोठी मागणी आहे.