Join us  

Mineral Water Business Idea: केवळ पाच लाखांत सुरू होऊ शकतो हा बिझनेस, प्रत्येक महिन्याला होईल ५० हजारांपर्यंत कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 8:43 PM

Mineral Water Business Idea: तुम्हालाही कमी पैसे गुंतवून जास्त नफा देणारा व्यवसाय (High Profit Giving Business) करायचा आहे का?

काही महिन्यांपूर्वी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनून मुकेश अंबानींना मागे टाकणाऱ्या चीनच्या झोंग शानशानचे नाव तुम्हाला नक्कीच आठवत असेल. त्यांचा व्यवसाय काय आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. ते प्रत्यक्षात चीनमध्ये बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय चालवतात. म्हणजेच एक गोष्ट स्पष्ट आहे की बाटलीबंद पाण्याच्या (Mineral Water Business Idea) व्यवसायात जबरदस्त नफा आहे. आजच्या युगात बहुतेक लोक आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिण्यास प्राधान्य देतात.

कसा सुरू कराल व्यवसाय?सर्वप्रथम, तुम्हाला कंपनी कायद्यांतर्गत तुमच्या कंपनीची नोंदणी करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला पॅन क्रमांक आणि जीएसटी क्रमांक मिळेल. त्याच वेळी, किमान 1000 ते 1500 स्क्वेअर फूट जागा आवश्यक असेल, जिथे तुम्हाला आरओ, चिलर आणि कॅनसह सर्व मशीन्स बसवाव्या लागतील. यासोबतच पाण्याची कमतरता भासू नये म्हणून बोअरिंगही करावे लागणार आहे. बोरिंगसाठी तुम्हाला सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, मिनरल वॉटरचा सर्वाधिक खप शहरांमध्ये असल्यानं प्लांटही शहरांच्या बाजूला असलेला कधीही उत्तम म्हटला जातो.

किती मिळू शकतो नफा?जर तुम्ही 1000-1500 स्क्वेअर फूट जागेत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला सुमारे 4-5 लाख रुपये गुंतवावे लागतील. दुसरीकडे, जर तुमच्या प्लांटची क्षमता प्रति तास 1000 लिटर पाणी उत्पादनाची असेल तर तुम्ही 30 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपये प्रति महिना कमवू शकता. म्हणजेच मिनरल वॉटरचा व्यवसाय केल्यास वर्षभरात तुमचा खर्च निघेल आणि पुढच्या वर्षीपासून नफा मिळू शकेल. तुमच्या आजूबाजूला इतर कंपन्यांकडून पाणी पुरवठा होत असेल तर तुमच्यासाठी स्पर्धा वाढेल. अशा परिस्थितीत सर्व सोसायट्यांमध्ये पाण्याच्या मोठ्या बाटल्या पुरविण्याचे कंत्राटही घेतले तर तुमचा नफा वाढू शकतो.

भारतात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. एका अहवालानुसार, बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय दरवर्षी 20 टक्के दराने वाढत आहे, म्हणजेच या व्यवसायाची व्याप्ती अधिक आहे. कोरोनाच्या काळात लोक त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक झाले आहेत, त्यामुळे ते स्वच्छतेची पूर्ण काळजी घेत आहेत. तुम्हीही हा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आधी एकदा मार्केट रिसर्च करा आणि त्यानुसार तुम्हाला मिनरल वॉटर प्लांट कुठे लावायचा आहे ते पाहा. (टीप - कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)

टॅग्स :व्यवसायगुंतवणूक