Lokmat Money > बिझनेस न्यूज > फक्त ५० हजारांत ‘हा’ बिझनेस सुरु करा, कोट्यवधी कमवा; भरपूर मागणी, कधी नाही मंदी!

फक्त ५० हजारांत ‘हा’ बिझनेस सुरु करा, कोट्यवधी कमवा; भरपूर मागणी, कधी नाही मंदी!

Business Idea: आजकाल जमाना डिजिटलचा आहे. या क्षेत्रात कमी गुंतवणुकीतून चांगली कमाई करणारा बिझनेस सुरू करता येऊ शकेल. जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 12:40 PM2023-04-22T12:40:42+5:302023-04-22T12:42:20+5:30

Business Idea: आजकाल जमाना डिजिटलचा आहे. या क्षेत्रात कमी गुंतवणुकीतून चांगली कमाई करणारा बिझनेस सुरू करता येऊ शकेल. जाणून घ्या...

business idea money making tips how to start a digital hoarding business in india just invest 50 thousand and earn crore | फक्त ५० हजारांत ‘हा’ बिझनेस सुरु करा, कोट्यवधी कमवा; भरपूर मागणी, कधी नाही मंदी!

फक्त ५० हजारांत ‘हा’ बिझनेस सुरु करा, कोट्यवधी कमवा; भरपूर मागणी, कधी नाही मंदी!

Business Idea: अनेकांना स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची इच्छा असते. मात्र, भागभांडवल, गुंतवणूक यांमुळे अनेकांची इच्छा पूर्ण होत नाही. काही जणांकडे चांगल्या कल्पना असतात, पण त्या अनेकदा सत्यात उतरत नाहीत. अलीकडील काळात डिजिटल गोष्टींवर भर जास्त आहे. अगदी व्यवहारांपासून ते करन्सीपर्यंत अनेक गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. याच डिजिटल क्षेत्रातील एक बिझनेस तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता. या बिझनेसमध्ये जम बसू लागला की कोट्यवधींची कमाई करू शकता. तसेच या बिझनेसला चांगली डिमांड असल्याचे सांगितले जात आहे. (How to start a hoarding business in India) 

ऑनलाइन होर्डिंग्सच्या (Digital Hoardings Business) बिझनेसमधून सुरुवातीला लाखोंची कमाई सुरू होऊ शकते. डिजिटलच्या काळात ऑनलाइन होर्डिंग्सचा बिझनेस फायदेशीर ठरू शकतो. या बिझनेसमधून अनेक होर्डिंग्स कंपन्यांची कोट्यवधी रुपयांची कमाई होत आहे. ऑनलाइन होर्डिंगचा बिझनेस कसा सुरू करू शकता आणि त्यात किती कमाई केली जाऊ शकते, जाणून घेऊया...

मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हे काम सुरू करता येईल

आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग स्टार्टअप कंपनीच्या संस्थापक दीप्ती अवस्थी शर्मा या बिझनेसबाबत बोलताना सांगितले की, सन २०१६ मध्ये त्यांनी फक्त ५० हजार रुपयांपासून डिजिटल होर्डिंगचा बिझनेस सुरू केला. ही कल्पना यशस्वी झाली आणि अल्पावधीतच कमाई सुरू झाली. मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हे काम सुरू करता येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या डोमेन नावाने वेबसाइट तयार करावी लागेल. त्यानंतर स्वतःच प्रचार, प्रसार करावा. होल्डिंग्समध्ये जाहिरात ऑनलाइन दिली जाऊ शकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही होर्डिंग्सची जागा भाड्याने घ्यावी लागेल. मग मोठ्या कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या जाहिराती येथे देऊ शकता. कॉम्प्युटर डिझायनिंग किंवा ग्राफिक्सचे ज्ञान असेल तर तुम्ही डिजिटल होल्डिंगचा बिझनेस सहज सुरू करू शकता. या बिझनेससाठी ऑनलाइन प्रमोशन करावे लागेल. त्यानंतर ऑनलाइन ऑर्डर प्राप्त करून पैसे कमवू शकता.

दरमहा १ लाख रुपये कमाई होऊ शकते

जेव्हा मी यावर संशोधन केले, तेव्हा मला कळले की हे क्षेत्र अतिशय असंघटित पद्धतीने काम करीत आहे आणि या डिजिटल जगात लोकांना सर्व काही घरी बसून हवे आहे. अशा स्थितीत हा व्यवसाय अतिशय फायदेशीर व्यवहार वाटत होता, असे दीप्ती अवस्थी शर्मा यांनी म्हटले आहे. आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग स्टार्टअप ही कंपनी एका महिन्याच्या कालावधीसाठी होर्डिंग लावण्यासाठी सुमारे १ लाख रुपये घेते. यावरुन या बिझनेसमधील संधींचा अंदाज बांधला जाऊ शकतो. 

(टीप - या लेखात केवळ गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: business idea money making tips how to start a digital hoarding business in india just invest 50 thousand and earn crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.