Lokmat Money > बिझनेस न्यूज > Business Idea: कधीच नाही मंदी, बारा महिने चांदी! घरबसल्या कमाईची संधी, ‘हा’ बिझनेस करा अन् मालामाल व्हा!

Business Idea: कधीच नाही मंदी, बारा महिने चांदी! घरबसल्या कमाईची संधी, ‘हा’ बिझनेस करा अन् मालामाल व्हा!

Business Idea: भारतीय रेल्वेशी संबंधित हा बिझनेस अगदी कमी गुंतवणुकीतून सुरू करता येऊ शकतो. त्यातून महिन्याला लाखो रुपये कमावले जाऊ शकतात. कसे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:41 PM2023-03-30T12:41:14+5:302023-03-30T12:42:23+5:30

Business Idea: भारतीय रेल्वेशी संबंधित हा बिझनेस अगदी कमी गुंतवणुकीतून सुरू करता येऊ शकतो. त्यातून महिन्याला लाखो रुपये कमावले जाऊ शकतात. कसे? जाणून घ्या...

business idea start business with irctc indian railways to become ticket booking agent and earn lakhs every month know about how to start | Business Idea: कधीच नाही मंदी, बारा महिने चांदी! घरबसल्या कमाईची संधी, ‘हा’ बिझनेस करा अन् मालामाल व्हा!

Business Idea: कधीच नाही मंदी, बारा महिने चांदी! घरबसल्या कमाईची संधी, ‘हा’ बिझनेस करा अन् मालामाल व्हा!

Business Idea: एकीकडे जागतिक मंदीमुळे हजारो नोकऱ्यांवर गदा येताना दिसत आहे. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, भांडवल उभे करण्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे अनेक जण बिझनेस कुरू करण्याचे धाडस करत नाहीत. मात्र, आता अगदी अत्यल्प भांडवलात चांगला बिझनेस करणे शक्य आहे. हा बिझनेस भारतीय रेल्वेशी संलग्न असून, या एकदा बिझनेस सुरू केला की, हजारो रुपयांची कमाई तुम्ही करू शकता, असे सांगितले जात आहे. 

भारतीय रेल्वेचा व्याप प्रचंड आहे. देशभरात रेल्वे सेवांचे जाळे आहे. लांब पल्ल्यांच्या रेल्वेसेवांचा यातील वाटा मोठा आहे. रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या सेवांमध्ये तिकीट बुकिंग हा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वे वेगवेगळ्या सुविधा करते. भारतीय रेल्वेत प्रवासासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग, स्टेशनवरील तिकीट काउंटर व्यतिरिक्त एजंटद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेचे एजंट बनून तुम्हीही उत्तम बिझनेस करून मोठी कमाई करू शकता. 

IRCTC रेल्वे तिकीट एजंट कसे बनायचे?

IRCTC च्या साइटवरून रेल्वेचे तिकीट काढता येते. यामध्ये सर्वसामान्य प्रवाशांसाठी आणि रेल्वेच्या एजंटसाठी स्वतंत्र तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध असते. IRCTC ला रेल्वे तिकिटे विकण्याचा अधिकार आहे. तिकीट बुकिंगसाठी ट्रॅव्हल एजंट नियुक्त करण्याचा अधिकार आहे. या रेल्वे एजंट्सचे काम सामान्य नागरिकांसाठी ट्रेनची तिकिटे बुकिंग करून देण्याचे आहे. यासाठी IRCTC अधिकृत एजंटला कमिशन म्हणून काही ठराविक रक्कम देते. प्रत्येक शहरात आयआरसीटीसीकडून एजंट नेमले जातात, ज्यांना IRCTC कडून लॉगिन आयडी दिला जातो, ज्याद्वारे ते तिकीट बुक करू शकतात.

असे बना रेल्वेचे अधिकृत एजंट

तुम्हाला आयआरसीटीसीचा अधिकृत एजंट बनायचे असेल तर त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड यासारख्या आवश्यक कागदपत्रांव्यतिरिक्त, स्टॅम्प पेपरवर एक करार तयार करावा लागतो. त्यानंतर आयआरसीटीसीच्या नावाने २० हजारांचा डिमांड ड्राफ्ट तयार केला जातो, जो बँकेत जमा करायचा. त्यापैकी १०,००० रुपये सुरक्षित ठेव आहे, जी एजंट आयडी परत केल्यास रिफंड केली जाते. याशिवाय, एजंटला त्याच्या आयडीच्या नूतनीकरणासाठी दरवर्षी ५,००० रुपये अतिरिक्त रक्कम दिली जाते. IRCTC चा रेल्वे सेवा एजंट बनण्यासाठी तुम्हाला वर्ग वैयक्तिक डिजिटल प्रमाणपत्र देखील घ्यावे लागेल.

दर महिन्याला होईल हजारो रुपयांची कमाई

IRCTC एजंटला प्रत्येक बुकिंगवर निश्चित कमिशन मिळते. सोप्या शब्दात बोलायचे तर तुमहाला एका बुकिंगवर सुमारे २० ते ४० रुपये मिळतील. नॉन एसी तिकिटांसाठी २० रुपये तर एसी तिकिटांसाठी ४० रुपये कमिशन मिळू शकते, असे सांगितले जाते. तर काहीवेळा ते जास्त असू शकते. अशा परिस्थितीत, जर आपण कमाईबद्दल बोललो, तर जितकी बुकिंग जास्त तितकी तुमची कमाई जास्त असेल. एजंट म्हणून रेल्वेची तिकिटे बुकिंग करण्यावर मर्यादा नाही. शक्य असल्यास एका महिन्यात ७० ते ८० हजार रुपये सहज कमवू शकता. असे सांगितले जाते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: business idea start business with irctc indian railways to become ticket booking agent and earn lakhs every month know about how to start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.