Lokmat Money > बिझनेस न्यूज > Business Idea : फक्त एकदाच करा 10 लाखांची गुंतवणूक, दर महिन्याला होईल मोठी कमाई!

Business Idea : फक्त एकदाच करा 10 लाखांची गुंतवणूक, दर महिन्याला होईल मोठी कमाई!

Business Idea : हा शेतीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एकदाच 10-15 लाख रुपये गुंतवावे लागतील, त्यानंतर तुम्ही दरमहा 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 01:46 PM2021-07-03T13:46:47+5:302021-07-03T13:48:18+5:30

Business Idea : हा शेतीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एकदाच 10-15 लाख रुपये गुंतवावे लागतील, त्यानंतर तुम्ही दरमहा 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

Business Idea: start farming only 10 thousand investment and earn 2 lakh monthly know how | Business Idea : फक्त एकदाच करा 10 लाखांची गुंतवणूक, दर महिन्याला होईल मोठी कमाई!

Business Idea : फक्त एकदाच करा 10 लाखांची गुंतवणूक, दर महिन्याला होईल मोठी कमाई!

नवी दिल्ली : जर तुम्हाला नोकरी करायची नसेल किंवा तुम्हाला घरी बसून अधिक पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी शेती (earn money from farming) हा एक चांगला पर्याय असू शकतो. ज्यामुळे तुम्ही अल्पावधीत लखपती (How to be a billionaire) बनू शकता. हा शेतीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एकदाच 10-15 लाख रुपये गुंतवावे लागतील, त्यानंतर तुम्ही दरमहा 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

सुरू करा शेती व्यवसाय
भारतातील अनेक राज्यांमध्ये शेवग्याच्या शेगांची शेती केली जाते. त्यात अनेक प्रकारचे मल्टी-व्हिटॅमिन, प्रथिने, अमीनो अॅसिड असतात. आरोग्य पूरक स्वरूपात त्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून देशात वाढली आहे. अनेक स्टार्टअप्स शेवग्यावर प्रक्रिया करून नवीन निरोगी उत्पादने तयार करीत आहेत. महाराष्ट्रातील रहिवासी प्रमोद पानसरे सुद्धा हाच व्यवसाय करीत आहेत. गेली दोन वर्षे शेवग्याची पाने आणि हळदीच्या मदतीने ते चॉकलेट, चिक्की, खाखरा आणि स्नॅक्स बनवून देशभर मार्केटिंग करत आहेत. सध्या ते दरमहा तीन लाख रुपयांचा व्यवसाय करीत आहे.

कसा करतात याचा व्यवसाय?
एका मीडिया रिपोर्टनुसार, प्रमोद यांनी या व्यवसायात 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि एक कार्यालय उघडले. त्यानंतर फूड परवान्यासह आवश्यक कागदपत्रे गोळा केली आणि व्यवसाय सुरू केला. प्रमोद यांच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही आरोग्यदायी गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली. यामुळे व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यात आम्हाला खूप मदत झाली. आमच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे.'

जाणून घ्या कशी करतात मार्केटिंग?
प्रमोद यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला ते स्टॉल्स लावून आपली उत्पादने बाजारात आणत असत. नंतर जेव्हा त्या उत्पादनाची मागणी वाढू लागली, तेव्हा किरकोळ विक्रेते आणि मोठ्या घाऊक विक्रेत्यांशी संपर्क साधून मार्केटिंग सुरू झाले. प्रमोशनसाठी सोशल मीडियाचीही मदत घेतली.

Web Title: Business Idea: start farming only 10 thousand investment and earn 2 lakh monthly know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.