जर आपण एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर आपण उन्हाळ्याच्या सिझनमध्ये आइस क्यूब फॅक्टरी (Ice Cube Factory) सुरू करू शकता. उन्हाळ्यात बर्फाची मोठी मागणी असते. गाव असो अथवा शहर, उन्हाळ्यात दुकानांपासून ते लग्नसोहळ्यापर्यंत बर्फाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामुळे, आपण आइस क्यूब बनवण्याचा कारखाना सुरू करून चांगली कमाई करू शकता. महत्वाचे म्हणजे, केवळ शहरी भागातच नव्हे तर आपण आपल्या गावातही फॅक्टरी सुरू करू शकतात कारण आजकाल खेड्यापाड्यांतही बर्फाची मागणी वाढली आहे.
बिझनेस सुरू करायला किती पैसे लागतील? -
हा बिझनेस सुरू करण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल. यासाठी आपल्याला डीप फ्रीझर खरेदी करावे लागेल, याची किंमत अंदाजे 50,000 रुपयांपासून सुरू होते. याशिवाय आपल्याला इतर काही उपकरणेही खरेदी करावी लागतील. यानंतर, आपला बिझनेस जस जसा वाढत जाईल, तसतसे आवश्यकतेनुसार आपल्याला काही उपकरणे घ्यावे लगातील. महत्वाचे म्हणजे, बर्फ क्यूबचा बिझनेस सुरू करण्यापूर्वी, त्यासंदर्भात काही संशोधन करणे, मार्केटसंदर्भात माहिती मिळवणे आवश्यक आहे.
किती होईल कमाई? -
सुरुवातीला एक लाख रुपयांची गुंतवून केल्यानंतर आपण या बिझनेसमधून दर महिन्याला साधारणपणे 30,000 रुपये कमवू शकता. तसेच लग्न समारंभाच्या हंगामात बर्फाची मागणी वाढल्यानंतर आपण महिन्याला 50,000 रुपयेही कमवू शकता. महत्वाचे म्हणजे, बर्फ विकण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या भागात फक्टरी टाकली असेल, त्या ठिकाणी जवळपासचे ग्राहक येऊन तो घेऊन जातात. आपण आपला बर्फ आईस्क्रीमची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फळांची दुकाने आणि भाजीपाला विक्रेत्यांना विकू शकता.