Lokmat Money > बिझनेस न्यूज > Business Idea : फेस्टिव्ह सिझनमध्ये सुरू करा 'हा' बिझनेस; दरमहा होईल मोठी कमाई, होणार नाही नुकसान

Business Idea : फेस्टिव्ह सिझनमध्ये सुरू करा 'हा' बिझनेस; दरमहा होईल मोठी कमाई, होणार नाही नुकसान

देशात असे अनेक व्यवसाय (Business) आहेत ज्यात फार कमी पैसे गुंतवून (Investment) चांगले उत्पन्न मिळवता येते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 12:16 PM2022-10-03T12:16:20+5:302022-10-03T12:17:00+5:30

देशात असे अनेक व्यवसाय (Business) आहेत ज्यात फार कमी पैसे गुंतवून (Investment) चांगले उत्पन्न मिळवता येते

Business Idea Start led buld making business during the festive season diwali dusara There will be big earnings every month no loss | Business Idea : फेस्टिव्ह सिझनमध्ये सुरू करा 'हा' बिझनेस; दरमहा होईल मोठी कमाई, होणार नाही नुकसान

Business Idea : फेस्टिव्ह सिझनमध्ये सुरू करा 'हा' बिझनेस; दरमहा होईल मोठी कमाई, होणार नाही नुकसान

देशात असे अनेक व्यवसाय (Business) आहेत ज्यात फार कमी पैसे गुंतवून (Investment) चांगले उत्पन्न मिळवता येते. केंद्रातील मोदी सरकारही व्यवसायाला चालना देत आहे. यासोबतच सरकारने स्टार्ट-अप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याची मागणी आणि बाजारपेठ पाहणे अत्यंत आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्यवसाय सांगत आहोत. ज्याची मागणी खेड्यापासून शहरापर्यंत आहे. एलईडी बल्ब बनवण्याचा हा व्यवसाय आहे.

एलईडी बल्बची (LED Bulb) मागणी खूप वाढली आहे. हे बल्ब आल्यानंतर रोषणाईसोबतच विजेचे बिलही आटोक्यात आले आहे. या एलईडी बल्ब व्यवसायाच्या कल्पनेमुळे अनेकांना रोजगारही मिळाला आहे, ज्यांचे प्रशिक्षण शासनाकडून दिले जाते. हा बल्ब टिकाऊ असतो आणि बराच काळ टिकतो. ते प्लास्टिकचे असल्याने तुटण्याची भीती नाही. LED ला लाइट एमिटिंग डायोड म्हणतात. एलईडी बल्बचे आयुष्य साधारणपणे 50000 तास किंवा त्याहून अधिक असते, तर CFL बल्बचे आयुष्य फक्त 8000 तासांपर्यंत असते. विशेष बाब म्हणजे एलईडी बल्ब रिसायकल करता येतात. एलईडीमध्ये सीएफएल बल्ब प्रमाणे पारा नसतो, परंतु शिसे आणि निकेल सारखे घटक असतात.

सुरू करू शकता व्यवसाय
एलईडी बल्ब बनवण्याच्या प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला एलईडीचे बेसिक, पीसीबीचे बेसिक, एलईडी ड्रायव्हर, फिटिंग-टेस्टिंग, साहित्य खरेदी, मार्केटिंग, सरकारी अनुदान योजना आणि इतर अनेक गोष्टींबद्दल सांगितले जाईल. जर तुम्हाला हे छोट्या स्तरावर सुरू करायचे असेल तर ते फक्त 50,000 रुपयांपासून सुरू करता येईल. या कामासाठी तुम्हाला दुकान उघडण्याची गरज नाही. तुम्ही हे घरबसल्या सहज सुरू करू शकता.

किती असेल कमाई?
एक एलईडी बल्ब तयार करण्यासाठी साधारपणे 50 रूपयांचा खर्च येतो. तसंच बाजारात सहजपणे हे बल्ब 100 रूपयांना विकले जातात. याचाच अर्थ एका बल्बवर दुप्पट नफा होऊ शकतो. जर तुम्ही एका दिवसात 100 बल्ब तयार केले तर तुमची थेट कमाई 5000 रूपये होईल. अशात तुम्ही महिन्याला दीड लाखांपर्यंत कमाई करू शकता. 

Web Title: Business Idea Start led buld making business during the festive season diwali dusara There will be big earnings every month no loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.