Lokmat Money > बिझनेस न्यूज > Business Idea: नोकरीत टेन्शन असेल तर २० हजार रुपयांत हा व्यवसाय सुरु करा; वर्षाला ४ लाख रुपये कमवा

Business Idea: नोकरीत टेन्शन असेल तर २० हजार रुपयांत हा व्यवसाय सुरु करा; वर्षाला ४ लाख रुपये कमवा

Business Idea Farming: यासाठी जास्त पैशांची गरज लागणार नाही. परंतू जी गोष्ट तुम्हाला सर्वात पहिली लागेल ती म्हणजे शेतीची जमीन. सहसा गावाशी संबंधित सर्व लोकांकडे शेतीयोग्य जमीन असते. जर कोणाकडे नसेल तर तुम्ही भाडेतत्त्वावर जमीन घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 08:46 AM2022-01-13T08:46:34+5:302022-01-13T08:47:04+5:30

Business Idea Farming: यासाठी जास्त पैशांची गरज लागणार नाही. परंतू जी गोष्ट तुम्हाला सर्वात पहिली लागेल ती म्हणजे शेतीची जमीन. सहसा गावाशी संबंधित सर्व लोकांकडे शेतीयोग्य जमीन असते. जर कोणाकडे नसेल तर तुम्ही भाडेतत्त्वावर जमीन घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता.

Business Idea: start Lemon Grass Farming business for Rs. 20,000; Earn Rs. 4 lakhs per year | Business Idea: नोकरीत टेन्शन असेल तर २० हजार रुपयांत हा व्यवसाय सुरु करा; वर्षाला ४ लाख रुपये कमवा

Business Idea: नोकरीत टेन्शन असेल तर २० हजार रुपयांत हा व्यवसाय सुरु करा; वर्षाला ४ लाख रुपये कमवा

जर तुम्ही कोणता व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच एका व्यवसायाचा उल्लेख केला आहे. हा एक असा व्यवसाय आहे, ज्याच्याशिवाय लोकांचा सकाळचा नाश्ता अपूर्ण राहतो. चला तर मग नोकरी, धंद्यासोबत उत्पन्न वाढविण्यासाठी काय करता येईल ते पाहुया. (Lemon Grass Farming) 

यासाठी जास्त पैशांची गरज लागणार नाही. परंतू जी गोष्ट तुम्हाला सर्वात पहिली लागेल ती म्हणजे शेतीची जमीन. सहसा गावाशी संबंधित सर्व लोकांकडे शेतीयोग्य जमीन असते. जर कोणाकडे नसेल तर तुम्ही भाडेतत्त्वावर जमीन घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. कारण हा व्यवसाय फायदेशीर आहे. आज आपण ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो लेमन ग्रास फार्मिंगशी संबंधित आहे. काही लोक त्याला 'लेमन ग्रास' असेही म्हणतात.

एक हेक्टर जमिनीत त्याची लागवड करून तुम्ही वार्षिक ४ लाख रुपये कमवू शकता. जेव्हा मागणी जास्त असते तेव्हा तुम्ही उत्पादन वाढवून तुमचे उत्पन्न आणखी वाढवू शकता. लेमनग्रास वनस्पती एक रुपयापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्राणी खात नाहीत आणि किडही लागत नाही.

उपयोग काय...
लेमन ग्रासपासून काढलेले तेल सौंदर्यप्रसाधने, साबण, तेल आणि औषधे बनवणाऱ्या कंपन्या वापरतात. त्याचे रोप दुष्काळग्रस्त भागातही लावता येते. या लागवडीसाठी खताचीही गरज भासत नाही. एकदा पीक पेरले की ते 5-6 वर्षे टिकते.
लेमन ग्रास लागवडीची वेळ फेब्रुवारी ते जुलै आहे. वर्षातून तीन ते चार वेळा कापणी केली जाते. यातून निघणाऱ्या तेलाचा दर 1 हजार ते 1500 रुपये किलोपर्यंत आहे. लागवडीनंतर चार महिन्यांनी पहिली काढणी केली जाते. लिंबू ग्रास तयार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी, ते तोडल्यानंतर आणि त्याचा वास घेतल्यास, तुमचे पीक तयार आहे. एका वर्षात अर्धा गुंठा जमिनीतून सुमारे 3 ते 5 लिटर तेल निघते. जमिनीपासून ५ ते ८ इंच वर कापणी करावी. दुसऱ्या कापणीत 1.5 लीटर ते 2 लीटर तेल निघते. उत्पादन क्षमता तीन वर्षांपर्यंत वाढते.

'मन की बात' कार्यक्रमाच्या 67 व्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेमन ग्रासच्या लागवडीचा उल्लेख केला होता. याचा संदर्भ देत ते म्हणाले होते की, या शेतीमुळे शेतकरी बांधव स्वत:ला सक्षम बनवत आहेत आणि देशाच्या प्रगतीतही हातभार लावत आहेत.
 

Web Title: Business Idea: start Lemon Grass Farming business for Rs. 20,000; Earn Rs. 4 lakhs per year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.