Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'हा' शानदार व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल लाखोंची कमाई; सरकारही करेल मदत 

'हा' शानदार व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल लाखोंची कमाई; सरकारही करेल मदत 

Business Idea : या व्यवसायाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार देखील तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला स्वस्त आणि सुलभ अटींवर कर्ज देते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 06:20 PM2022-03-28T18:20:21+5:302022-03-28T18:22:22+5:30

Business Idea : या व्यवसायाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार देखील तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला स्वस्त आणि सुलभ अटींवर कर्ज देते.

business idea wooden furniture business plan with investment of 2 lakh rupees you will get one lakh rupees income per month | 'हा' शानदार व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल लाखोंची कमाई; सरकारही करेल मदत 

'हा' शानदार व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल लाखोंची कमाई; सरकारही करेल मदत 

नवी दिल्ली : स्वतःचा छोटा पण योग्य व्यवसाय असावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. बर्‍याच वेळा लोक नोकरीसह व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बिझनेस प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही काही दिवसात लाखो रुपये कमवू शकता. हा व्यवसाय म्हणजे लाकडी फर्निचर. या व्यवसायाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार देखील तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला स्वस्त आणि सुलभ अटींवर कर्ज देते.

सध्याच्या काळात होम डेकोर आणि वुडन फर्निचरची मागणी बाजारात झपाट्याने वाढत आहे. आजकाल घरापासून दुकाने आणि रेस्टॉरंटपर्यंत सर्वत्र वुडन फर्निचरची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत वुडन फर्निचरचा व्यवसाय सुरू केल्यास काही दिवसांत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल. तुम्हालाही हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आम्ही तुम्हाला या व्यवसायाची खास माहिती देत आहोत...

व्यवसाय सुरू करण्यासाठी किती पैसे लागतील?
लाकूड, दुकान, फर्निचर बनवण्याची जागा इत्यादींसाठी तुम्हाला जवळपास 1.85 लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला लाकूड वाहतूक, फर्निचर बनवण्यासाठी कामगारांसाठी सुद्धा गुंतवणूक करावी लागेल. व्यवसायाच्या वाढीबरोबर गुंतवणूकही वाढवावी लागेल. यासाठी तुम्ही बँकेकडून कंपोझिट लोन म्हणून 7.48 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता. या पैशात, तुम्हाला स्थिर भांडवल म्हणून 3.65 लाख रुपये आणि खेळते भांडवल म्हणून 5.70 लाख रुपये मिळतील.

व्यवसायात होईल खूप फायदा 
फर्निचर व्यवसाय सुरू केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या गुंतवलेल्या पैशाचा परतावा काही दिवसांत मिळेल. तुम्हाला दरमहा 60 हजार रुपये ते 1 लाख रुपये निव्वळ नफा होईल. या पैशातून तुम्ही बँकेचे कर्जही लवकरच फेडाल.

Web Title: business idea wooden furniture business plan with investment of 2 lakh rupees you will get one lakh rupees income per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.