नवी दिल्ली: एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक समस्यांचा सामना कत आहेत. त्यातच आता अनिल अंबानी यांची आर्थिक परिस्थिती अशी झालीय की वकिलांची फी भरण्यासाठी त्यांच्यावर दागिने विकण्याची वेळ आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेले उद्योजक अनिल अंबानी यांनी इंग्लंडमधील कोर्टात ही माहिती दिली.
अंबानी यांनी चीनमधील तीन 4 हजार 760 कोटीचे बँकांकडून कर्ज घेतलं आहे. त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत अंबानी यांनी सध्याच्या आपल्या आर्थिक परिस्थितीबीबत माहिती दिली आहे. अनिल अंबनी म्हणाले की, मी एक सर्वसामान्य आयुष्य जगत असून सध्या माझा खर्च पत्नी टीना अंबानी करत आहे. तसेच मागील सहा महिन्यात पत्नीचे 9 कोटी 90 लाखांचे दागिने विकले आहेत. आता स्वतःजवळ काही किंमत ऐवज उरलेला नाही, अशी माहिती अनिल अंबानी यांनी न्यायालयाला दिली.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनिल अंबानी शुक्रवारी लंडनमधील उच्च न्यायालयासमोर हजर राहिले. यावेळी जवळपास तीन तास प्रश्नउत्तरं विचारण्यात आली. संपत्ती, कर्जदार आणि खर्चांबाबतची माहिती त्यांना विचारण्यात आली. यावेळी माझ्या श्रीमंतीविषयी माध्यमांनी अफवा पसरवल्या, माझ्याजवळ कधीच रोल्स रॉयस ही आलिशान मोटार नव्हती. आताही केवळ एकच कार आपल्या सोबत आहे, असं अनिल अंबानी यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले आहे.
संपत्तीची माहिती देण्याचे कोर्टाचे अनिल अंबानींना निर्देश-
यूके हायकोर्टने 22 मे, 2020 रोजी अनिल अंबानी यांना 12 जून, 2020 पर्यंत चीनच्या तीन बँकांना 71,69,17,681 डॉलर (सुमारे 5,281 कोटी रुपये) कर्जाची रक्कम आणि 50,000 पौंड (सुमारे 7 कोटी रुपये) कायदेशीर खर्चाच्या रुपाने फेडावेत असं सांगितलं होतं. यानंतर 15 जून रोजी इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायनाच्या नेतृत्त्वात चिनी बँकांनी अनिल अंबानींनी संपत्तीची माहिती द्यावी अशी मागणी केली होती.
‘कुटुंबाचाही आधार नाही’-
मध्यंतरी एरिक्सन या स्वीडिश टेलिकॉम कंपनीचे ६० दशलक्ष पौंडाचे देणे दिले नाही तर तुरुंगात टाकण्याची तंबी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनिलअंबानी यांना दिली तेव्हा मोठे बंधू मुकेश यांनीते पैसे देऊन कुटुंबाची लाज राखली होती. पण आता कुटुंबात कोणी मदत करायला तयार नाही, असं अनिल अंबानी यांनी स्पष्ट केले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या-
'ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है'; भाजपा आमदाराचं संभ्रमात टाकणारं विधान
कंगना भाजपात प्रवेश करणार?; देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान
'...तर मला काय फरक पडतो, माझे दोन नंबरचे कोणतेही काम नाही'; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण