Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI सहित १४ बँकांना रिझर्व्ह बँकेनं ठोठावला दंड; नियमांचं उल्लंघन केल्याचा आहे आरोप

SBI सहित १४ बँकांना रिझर्व्ह बँकेनं ठोठावला दंड; नियमांचं उल्लंघन केल्याचा आहे आरोप

Reserve Bank Of India : रिझर्व्ह बँकेनं १४ बँकांवर ५० लाख रूपयांपासून २ कोटी रूपयांपर्यंत दंड ठोठावला आहे. यामध्ये सरकारी, खासगी, परदेशी बँकांसह अनेक बँकांचा समावेश. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 PM2021-07-08T16:11:01+5:302021-07-08T16:12:21+5:30

Reserve Bank Of India : रिझर्व्ह बँकेनं १४ बँकांवर ५० लाख रूपयांपासून २ कोटी रूपयांपर्यंत दंड ठोठावला आहे. यामध्ये सरकारी, खासगी, परदेशी बँकांसह अनेक बँकांचा समावेश. 

business news rbi penalises sbi amd 13 other banks for non adherence to nbfc lending rules | SBI सहित १४ बँकांना रिझर्व्ह बँकेनं ठोठावला दंड; नियमांचं उल्लंघन केल्याचा आहे आरोप

SBI सहित १४ बँकांना रिझर्व्ह बँकेनं ठोठावला दंड; नियमांचं उल्लंघन केल्याचा आहे आरोप

Highlightsरिझर्व्ह बँकेनं १४ बँकांवर ५० लाख रूपयांपासून २ कोटी रूपयांपर्यंत दंड ठोठावला आहे. यामध्ये सरकारी, खासगी, परदेशी बँकांसह अनेक बँकांचा समावेश. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कर्ज वाटपाशी निगडीत काही नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी १४ बँकांना दंड ठोठावला आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचाही (State Bank Of India) समावेश आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेनं इंडसइंड बँक, बंधन बँक आणि बँक ऑफ बडोदालाही दंड ठोठावला आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनसार या बँकांना नॉन बँकिंग फायनॅन्शिअल कंपनीजना कर्ज देण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आखण्यात आल्या आहेत, त्याचं उल्लंघन केलं आहे. याशिवाय बँकांना लोन आणि अॅडव्हान्सवर जी बंधन आणि प्रोव्हिजन करण्यात आल्या आहेत. त्याचं पालन न करणं, सेंट्रल डेटाबेसमध्ये याच्याशी निगडीत सूचना नं देण्याचाही समावेश आहे. रिझर्व्ह बँकेनं या बँकांवर ५० लाख रूपयांपासून २ कोटी रूपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. ज्या बँकांवर दंड ठोठावला आहे त्यामध्ये सरकारी, खासगी, परदेशी, को-ऑपरेटिव्ह आणि स्मॉल फायनॅन्स बँकेचा समावेश आहे. 

कोणत्या बँकेला किती दंड ?
बँक ऑफ बडोदाला सेंट्रल बँकेनं २ कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँख, क्रेडिट सुईस एजी, बंधन बँक, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, उत्कर्ष स्मॉल फायनॅन्स बँक, करूर वैश्य बँक, कर्नाटक बँक, पंजाब अँड सिंध बँक, जम्मू अँड काश्मीर बँक या बँकांना १ कोटी रूपये आणि एसबीआयला ५० लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. 

Web Title: business news rbi penalises sbi amd 13 other banks for non adherence to nbfc lending rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.