Lokmat Money > बिझनेस न्यूज > Reliance Industries News: आता मुकेश अंबानी चॉकलेट क्षेत्रातही, 'या' कंपनीत खरेदी करणार मोठा हिस्सा

Reliance Industries News: आता मुकेश अंबानी चॉकलेट क्षेत्रातही, 'या' कंपनीत खरेदी करणार मोठा हिस्सा

देशातील दुसरे मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या हाती आणखी एक कंपनी येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 03:24 PM2022-12-30T15:24:23+5:302022-12-30T15:25:21+5:30

देशातील दुसरे मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या हाती आणखी एक कंपनी येणार आहे.

business-news-reliance-acquires-51-percent-stake-in-lotus-chocolate-for-74-cr-know-details | Reliance Industries News: आता मुकेश अंबानी चॉकलेट क्षेत्रातही, 'या' कंपनीत खरेदी करणार मोठा हिस्सा

Reliance Industries News: आता मुकेश अंबानी चॉकलेट क्षेत्रातही, 'या' कंपनीत खरेदी करणार मोठा हिस्सा

देशातील दुसरे मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या हाती आणखी एक कंपनी येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं एफएमजीसी युनिट रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड लोटस चॉकलेटमध्ये मोठा हिस्सा खरेदी करणार आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने लोटस चॉकलेट्सच्या प्रवर्तकांसह एक करार केला आहे. कंपनी चॉकलेट, कोको उत्पादने आणि कोको डेरिव्हेटिव्ह्ज तयार करते. शेअर खरेदी करारांतर्गत, RCPL ने लोटस चॉकलेटच्या पेड-अप शेअर कॅपिटलपैकी 77 टक्के हिस्सा संपादन केला आहे.

कंपनीचे प्रवर्तक प्रकाश पेराजे पै आणि अनंत पेराजे पै यांच्याकडून शेअर बाजारात खरेदी केली जाणार आहे. यानंतर, रिलायन्स कंपनीतील २६ टक्के स्टेक घेण्यासाठी खुली ऑफर देईल. रिलायन्स या कंपनीतील ५१ टक्के हिस्सा ७४ कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. ही खरेदी ११३ रुपये प्रति शेअर या दराने करण्यात आली आहे. RCPL ही रिलायन्स रिटेलची उपकंपनी आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत रिलायन्स रिटेलचा एकत्रित निव्वळ नफा ३६ टक्क्यांनी वाढून २,३०५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

नवा ब्रँड लाँच
रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने अलीकडेच आपला ब्रँड इंडिपेंडन्स लाँच केला आहे. सध्या ते गुजरातमधील अहमदाबाद येथे लाँच करण्यात आले आहे. नंतर ते देशभर सुरू करण्याची योजना आहे. रिलायन्स रिटेलच्या प्रमुख मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी या आहेत. खाद्यतेल, डाळी, तृणधान्ये, पॅकेज्ड फूड आणि इतर दैनंदिन गरजेच्या उत्पादनांसह इतर परवडणारी उत्पादने इंडिपेंडन्स एफएमसीजी ब्रँड अंतर्गत सादर केली जातील, असे ईशा अंबानी यांचं म्हणणं आहे.

Web Title: business-news-reliance-acquires-51-percent-stake-in-lotus-chocolate-for-74-cr-know-details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.