Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्वा! दरमहा 3 लाखांचा नफा देणारी 'ही' शेती; मागणी इतकी की कमाईमध्ये भासणार नाही कमतरता 

व्वा! दरमहा 3 लाखांचा नफा देणारी 'ही' शेती; मागणी इतकी की कमाईमध्ये भासणार नाही कमतरता 

सध्या बाजारात एक किलो हिंगाची किंमत सुमारे 35000 रुपये प्रति किलो आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:24 AM2023-01-18T11:24:49+5:302023-01-18T11:25:49+5:30

सध्या बाजारात एक किलो हिंगाची किंमत सुमारे 35000 रुपये प्रति किलो आहे.

business opportunity how to asafoetida farming for monthly income earn money | व्वा! दरमहा 3 लाखांचा नफा देणारी 'ही' शेती; मागणी इतकी की कमाईमध्ये भासणार नाही कमतरता 

व्वा! दरमहा 3 लाखांचा नफा देणारी 'ही' शेती; मागणी इतकी की कमाईमध्ये भासणार नाही कमतरता 

नवी दिल्ली : जर तुम्हाला शेतीचा आनंद असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल (Business opportunity) सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहा 3 लाख रुपये कमवू शकता. या व्यवसायाची सर्वात खास गोष्ट म्हणजे याची मागणी 12 महिने कायम असते. दरम्यान, आम्ही सांगत आहोत हिंग लागवडीबद्दल…तुम्ही हिंगाच्या लागवडीद्वारे मोठी कमाई करू शकता. 

सध्या बाजारात एक किलो हिंगाची किंमत सुमारे 35000 रुपये प्रति किलो आहे. जर तुम्ही एका महिन्यात 5 किलो हिंग देखील विकलात तर तुम्हाला भरपूर कमाई मिळेल. हिंगाची लागवड प्रामुख्याने अफगाणिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये केली जाते.

हिंग लागवडीसाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. भारतात, हे तापमान डोंगराळ भागात आरामात आढळते आणि या भागात सहजपणे लागवड करता येते. हिंगाच्या लागवडीसाठी जास्त थंड किंवा जास्त उष्णता आवश्यक नाही.

कशी केली जाते हिंगाची शेती?
>> हिंगाच्या बिया आधी ग्रीन हाऊसमध्ये 2-2 फूट अंतरावर पेरल्या जातात.
>> त्यानंतर रोप 5 फूट अंतरावर लावले जाते.
>> जमिनीला स्पर्श करून ओलावा पाहूनच त्यात पाणी शिंपडता येते, जास्त पाणी झाडाला हानी पोहोचवू शकते.
>> पालापाचोळा देखील झाडांना ओलावा देण्यासाठी वापरता येतो, एक विशेष गोष्ट म्हणजे हिंगाचे झाड होण्यासाठी 5 वर्षे लागतात.
>> डिंक झाडाच्या मुळांपासून आणि देठातून काढला जातो.

किती करावी लागेल गुंतवणूक?
जर गुंतवणुकीबद्दल सांगायचे झाल्यास जर तुम्ही हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरू केला तर तुम्हाला किमान 5 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय तुम्हाला मशिन्ससाठी पैसेही खर्च करावे लागतील.

आवश्यक कागदपत्रे
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ, जीएसटी नंबर, बिझनेस पॅन कार्ड यांसारख्या अनेक कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.

व्यवसायात किती मिळेल प्रॉफिट?
जर आपण हिंगाच्या व्यवसायातील नफ्याबद्दल बोललो तर ते आपल्या व्यवसायाच्या पातळीवर अवलंबून असते. तसे, बाजारात एक किलो हिंगाची किंमत सुमारे 35,000 रुपये आहे, त्यामुळे जर तुम्ही एका महिन्यात 5 किलो हिंग विकले तर तुम्हाला महिन्याला 1,75,000 रुपये मिळू शकतात. यापेक्षा जास्त कमाई करण्यासाठी तुम्ही मोठ्या कंपन्यांशी टायअप देखील करू शकता. याशिवाय, जर तुम्ही तुमचे उत्पादन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लिस्ट करून विकले तर तुम्ही दरमहा 3 लाख रुपये कमवू शकता.

Web Title: business opportunity how to asafoetida farming for monthly income earn money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.