Join us  

रेल्वेकडून कमाईची संधी! अशा प्रकारे रेल्वे स्टेशनवर उघडा स्वत:चे दुकान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 7:50 PM

Business Plan : रेल्वे स्टेशनवर दुकान उघडण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवर जावे लागेल.

नवी दिल्ली : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विविध पावले उचलत असते. तुम्ही जेव्हा कधी रेल्वे स्टेशनवर (Railway Station) जाल तेव्हा तुम्हाला तिथे अनेक प्रकारची दुकाने दिसतील. तुम्ही या दुकानांतून अनेकदा वस्तू खरेदी केल्या असतील. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही तुमची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू (New Business Idea) करायचा असेल, तर रेल्वे तुम्हाला कमाई करण्याची उत्तम संधी देत ​​आहे. जर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर स्वतःचे दुकान उघडून चांगली कमाई करायची असेल, तर त्यासाठी रेल्वे तुम्हाला सुवर्ण संधी देत ​​आहे.

दरम्यान, रेल्वे स्टेशनवर दुकान उघडण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या (IRCTC)वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला कोणत्या प्रकारचे दुकान उघडायचे आहे, याची पात्रता तपासावी लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे दुकान निविदा प्रक्रियेअंतर्गत उघडावे लागेल. पहिल्यांदा तुम्हाला रेल्वे स्टेशनवर कोणत्या प्रकारचे दुकान उघडायचे आहे ते निवडा. तुम्ही रेल्वे स्टेशनवर बुक स्टॉल (Book Stall), टी स्टॉल (Tea Stall), फूड स्टॉल (Food Stall), न्यूजपेपर स्टॉल इत्यादी कोणत्याही प्रकारचे दुकान उघडू शकता. या सर्व दुकानांसाठी तुम्हाला रेल्वेला शुल्क भरावे लागेल. यामध्ये तुम्हाला 40 हजार ते 3 लाख रुपये फी भरावी लागेल. रेल्वेला दिले जाणारे शुल्क हे दुकानाच्या आकारावर आणि जागेवरही अवलंबून असते.

स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश...स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन (Local Products at Railway Station) देण्यासाठी रेल्वे स्टेशनवर 'त्या' वस्तूंचे दुकान उघडण्यास सहज परवानगी देते, जे तेथील स्थानिक उत्पादन आहे. तुम्हालाही स्टेशनवर दुकान उघडून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. यामध्ये आधार कार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड (PAN Card), पासपोर्ट (Passport), मतदार ओळखपत्र (Voter ID Card), बँक डिटेल्स (Bank Details) इत्यादी आवश्यक असतील.

रेल्वे टेंडरसाठी असा करा अर्ज...तुम्हालाही रेल्वे टेंडरसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही आधी या रेल्वे स्टेशनसाठी रेल्वेने टेंडर काढले आहे की नाही हे तपासावे. यासाठी तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन ते तपासू शकता. त्यानंतर टेंडर निघाल्यानंतर तुम्ही रेल्वेच्या झोनल ऑफिस किंवा डीआरएस ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म सबमिट करा. त्यानंतर रेल्वे फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी करते. यानंतर टेंडर काढल्याची माहिती मिळते. यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय रेल्वे स्टेशनवर सुरू करू शकता.

टॅग्स :रेल्वेव्यवसाय