राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा पोर्टफोलिओ स्टॉक 'टायटन कंपनी' (Titan Company) 2021 मध्ये 62 टक्क्यांनी वाढून 1,551 रुपये प्रति शेअरवरून 2,524.35 रुपये प्रति शेअरवर गेला आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनची एकत्रितपणे 4.87 टक्के हिस्सेदारी अथवा 4.33 कोटी शेअर्स आहेत..
CY2022 च्या पहिला बिझनेस दिवसात, टायटनचे शेअर 2524.35 रुपयांच्या मागच्या बंद पासून 0.6 टक्क्यांच्या घसरणीनंतर 2,508.30 रुपयांवर कमकुवत झाला होता. शेअर बाजारातील तांत्रिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की CY21 मध्ये बुलिश सेंटिमेंट सोबतच फेस्टिव्ह आणि मॅरिज सीझनच्या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंध शिथिल केल्यामुळे टायटनने चांगला परतावा दिला आहे.
गेल्या एका वर्षात, टायटनच्या शेअरची किंमत 1,551 रुपयांवरून (4 जानेवारी, 2021) 2,524.35 (31 डिसेंबर 2021 पर्यंत) रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती रु. 4,214 कोटी रुपयांनी वाढली आहे. गेल्या सहा महिन्यांत स्टॉक 43.53 टक्के आणि एका महिन्यात 6 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
तज्ज्ञांच्या मते, स्टॉक आता सर्व प्रमुख मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर ट्रेडिंग करत आहे. हा शेअर असलेल्या गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक असू द्यायला हवी. क्लोजिंग बेसिसवर रु. 2200 चा स्टॉप लॉस कायम ठेवून गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात.
(टीप - शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणेही अत्यंत आवश्यक आहे.)