Join us

पोस्टाच्या या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली का? पती-पत्नी वर्षाला मिळवू शकतात ६० हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 1:02 PM

मागील काही वर्षांत खासगी क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

Business : मागील काही वर्षांत खासगी क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, त्यामुळे पेन्शन नसल्याने वयाच्या एका टप्प्यानंतर आर्थिक समस्या अधिक गडद होतात. 

अशा वेळेस पेन्शन नसेल तर चांगला व्याजदर देणाऱ्या पोस्टाच्या योजना अत्यंत फायदेशीर ठरतात. पोस्टाची दरमहा निश्चित उत्पन्न देणारी अशीच एक योजना लोकप्रिय आहे. या योजनेत पती-पत्नी दोघांच्या नावे गुंतवणूक करून वर्षाला दरमहा साधारण पाच हजार रुपये मिळू शकतात, तर वर्षाला ६० हजार मिळू शकतात. ‘पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना’ असे योजनेचे नाव आहे. 

काय आहे पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना? 

पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेत वैयक्तिक आणि संयुक्त दोन्ही प्रकारे खाते उघडता येते. वैयक्तिक खाते उघडताना  या योजनेत किमान एक हजार रुपये आणि जास्तीतजास्त साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. परंतु, संयुक्त खात्यात जास्तीतजास्त नऊ लाखांपर्यंत रक्कम जमा केली जाऊ शकते. 

या योजनेत तुम्हाला सध्या ७.४ टक्के दराने वार्षिक व्याज मिळत आहे. योजनेंतर्गत एकूण ठेवींच्या वार्षिक व्याजांच्या आधारे परताव्याची मोजणी केली जाते. एकूण वार्षिक परतावा १२ भागांत विभागला जातो. अशा पद्धतीने दरमहा उत्पन्न खात्यात जमा करण्यास सांगू शकता किंवा वार्षिक परतावा खात्यात जमा करून त्यावर व्याज घेऊ शकता.

असा मिळेल परतावा : या योजनेची पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर ती पुन्हा प्रत्येकी पाच वर्षांसाठी वाढविता येते. योजनेत तुम्हाला सध्या वार्षिक व्याज मिळत आहे. 

योजनेचे स्वरूप : या योजनेत दोन किंवा तीन लोक एकत्रित खाते उघडू शकतात. यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सदस्याला समान प्रमाणात दिले जाते. आपण कधीही संयुक्त खाते एकाच व्यक्तीच्या म्हणजेच एकल खात्यात रूपांतरित करू शकता. तसेच एकल खातेदेखील संयुक्त खात्यात रूपांतरित करता येते. खात्यात बदल करण्यासाठी सर्व खाती सदस्यांनी संयुक्त अर्ज द्यावा लागतो. 

टॅग्स :व्यवसायपोस्ट ऑफिस