Lokmat Money > बिझनेस न्यूज > १० बाय १० च्या कॅफेतून व्यवसायाला सुरुवात; आज वर्षाला कमावतेय ५० कोटी ; वाचा 'या' उद्योजिकेचा प्रेरणादायी संघर्ष

१० बाय १० च्या कॅफेतून व्यवसायाला सुरुवात; आज वर्षाला कमावतेय ५० कोटी ; वाचा 'या' उद्योजिकेचा प्रेरणादायी संघर्ष

माणसाकडे उत्तम कौशल्य, संकटांशी भिडण्याची वृत्ती आणि योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल तर ती व्यक्ती कोणत्याही गोष्टींवर सहज मात करु शकते. आपण या निमित्ताने एका उद्योजिकेच्या संघर्षाच्या प्रवास जाणून घेणार आहोत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 01:15 PM2024-01-19T13:15:35+5:302024-01-19T13:18:14+5:30

माणसाकडे उत्तम कौशल्य, संकटांशी भिडण्याची वृत्ती आणि योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल तर ती व्यक्ती कोणत्याही गोष्टींवर सहज मात करु शकते. आपण या निमित्ताने एका उद्योजिकेच्या संघर्षाच्या प्रवास जाणून घेणार आहोत. 

Business Success story if bengaluru rameshwaram cafe founder divya rao who earn 50 crore in year | १० बाय १० च्या कॅफेतून व्यवसायाला सुरुवात; आज वर्षाला कमावतेय ५० कोटी ; वाचा 'या' उद्योजिकेचा प्रेरणादायी संघर्ष

१० बाय १० च्या कॅफेतून व्यवसायाला सुरुवात; आज वर्षाला कमावतेय ५० कोटी ; वाचा 'या' उद्योजिकेचा प्रेरणादायी संघर्ष

Success Story : भरभक्कम पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून आपल्या ध्येयासाठी झटणाऱ्या रामेश्‍वरम कॅफेच्या (Rameshwaram cafe) को-फाउंडर दिव्या राय या असंख्य तरुण-तरुणींच्या प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत. कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे त्यांनी रामेश्‍वरम कॅफेचा श्रीगणेशा केला.  

आपल्याकडे साउथ इंडियन पदार्थ म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो. रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी सहज उपलब्ध होणारे इडली, डोसा यांसारखे पदार्थ लोक मोठ्या चवीने खातात. असंच एक साउथ इंडियन कॅफे खूप प्रसिद्ध आहे. दहा बाय दहाच्या एका खोलीत सुरु केलेल्या या व्यवसायाने दिव्या यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. आजच्या घडीला त्यांनी बंगळुरुमध्ये रामेश्वरम कॅफेच्या तीन वेगवेगळ्या शाखा उभारल्या आहेत. हा कॅफे बेंगळुरूच्या इंदिरा नगरमध्ये आहे. हा कॅफे वर्षभरात ५० कोटींचा व्यवसाय करत आहे.

शैक्षणिक पार्श्वभूमी :

रामेश्वर कॅफे सुरु करण्याआधी दिव्या राय यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. दिव्या राय यांनी अहमदाबादमध्ये सीएचे शिक्षण पूर्ण केले. पण व्यवसाय करण्याचा विचार त्यांचा डोक्यातून जात नव्हता. दिव्या यांच्या निर्णयाला सुरुवातीला त्यांच्या आईने कडाडून विरोध केला. तरीही सीएच्या नोकरीकडे पाठ फिरवत त्यांनी व्यवसायात उडी मारली. पती राघवेंद्र राव यांच्या साहाय्याने त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली.पती-पत्नीच्या या जोडीने काही वर्षात रामेश्वरम कॅफेला एका नव्या उंचीवर पोहोचवलं. 

मध्मवर्गीय कुटुंबात जन्म :

दिव्या राय यांचा जन्म एका मध्मवर्गीय कुटुंबात झाला. शैक्षणिक खर्च म्हणून त्यांना फक्त १ हजार रुपये दर महिन्याला पॉकेट मनी मिळायचा. आयुष्यात काहीतरी करण्याची वृत्ती त्यांनी बालपणापासून अंगिकारली. त्यासाठी शिक्षण हा एकच मार्ग आहे हे त्यांना माहित होतं. त्यासाठी दिव्या राय यांनी शिकणाच्या निर्धार केला. 

पती राघवेंद्र राव यांची मोलाची साथ :

अहमबाद आयआयएममध्ये शिक्षण घेत असताना दिव्या यांनी नोकरी करायंच असं ठरवलं. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी देखील केली. त्या दरम्यान त्यांची ओळख  राघवेंद्र राव यांच्यासोबत झाली. तब्बल २० वर्षांचा हॉटेल इंडस्ट्रीचा अनुभव असलेल्या राघवेंद्र राव यांच्या प्रस्तावानंतर दिव्या राय यांनी त्यांच्यासोबत पार्टनरशिर करत व्यवसायात एंट्री केली. 

घरच्यांनी केला विरोध :

सीएची नोकरी सोडून व्यवसाय करण्याची कल्पना दिव्या यांच्या आईला मान्य नव्हती. स्त्यावर इडली, डोसा विकण्यासाठी आम्ही आमच्या मुलीला आयआयएम सारख्या संस्थेत शिकवलं नाही, असं त्यांच्या आईचं मत होतं. पण दिव्या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या.

१० बाय १० च्या खोलीत व्यवसायाला सुरुवात :

या कॅफेचा आकार जेमतेम १० बाय १० इतका आहे.बंगळुरूत हे लॉकप्रिय रामेश्वरम कॅफे आहे. बंगळुरू येथील इंदिरानगरमध्ये १० बाय १० स्क्वेअर फूटचं हे दुकान असून बाहरे लोकांची भलीमोठी गर्दी झालेली असते. मेकॅनिकल इंजिनिअर राघवेंद्रने यांनी पत्नीसह मिळून हे कॅफे सुरू केलं. त्यांनी सोशल मीडियाची ताकद ओळखली. त्यांच्या व्यवसाय हिट करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. जे एका महिन्यात 4.5 कोटींचा व्यवसाय करते आणि वर्षभरात सुमारे 50 कोटींचा व्यवसाय करते.

Web Title: Business Success story if bengaluru rameshwaram cafe founder divya rao who earn 50 crore in year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.