Join us

प्राध्यापकाच्या नोकरीकडे फिरवली पाठ; स्वप्नपूर्तीसाठी गाठली मुंबई, बनला कोट्यवधींचा मालक! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 5:07 PM

एल्केम लॅबोरेटरी या फार्मा कंपनाचे मालक बासुदेव सिंह यांचा उद्योग जगतातील प्रवास हा थक्क करणारा आहे. शिवाय अनेक तरूणांना प्रेरणा देणारा देखील आहे. 

Success Story : बिहारच्या छोटेखानी गावात जन्मलेल्या एका यशस्वी उद्योजकच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. एका अतिसामान्य कुटुंबातील मुलगा ते यशस्वी उद्योजक असा खडतर प्रवास बासुदेव सिंह यांनी केला. प्राध्यापकच्या नोकरीकडे पाठ फिरवून वासुदेव यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईची वाट धरली. मायानगरी मुंबईला स्वप्ननगरी असे देखील संबोधतात. अनेकांनी आपल्या संघर्षाचे धडे या शहारात गिरवले. त्यात एल्केम फार्मा लॅबोरेटरिज कंपनीचे संस्थापक बासुदेव सिंह यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. 

बिहार ते मुंबई असा संघर्षमय प्रवास करणारे बासुदेव सिंह एकेकाळी प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते. पण मनात स्वप्नपूर्तीचा असणारा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यासाठी त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून मुंबईची वाट धरली. १९६२ मध्ये आपल्या भावाला हाताशी घेत त्यांनी एका फार्मा डिस्ट्रीब्यूशन कंपनीची स्थापना केली. सुरूवातीला या व्यवसायात चांगला जम बसल्यानंतर दोघांनी स्वत:ची कंपनी काढली. 

अपार मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर वासुदेव यांनी एल्केम या फार्मा कंपनीची स्थापना केली. अखेर मोठ्या संघर्षानंतर एका ॲटीबॅक्टेरियल औषधाच्या निर्मितीने त्यांचे नशीब पालटले. टॅक्सीम नामक टॅब्लेटच्या विक्रीतून त्यांच्या एल्केम कंपनीला नवी ओळख प्राप्त झाली आणि ४५ कोटींच्या या उद्योगाचे बासुदेव सिंह मालक झाले. आज भारतात एल्केम कंपनीचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी