Lokmat Money > बिझनेस न्यूज > मध्यमवर्गीयांच्या गृहस्वप्नाला पंख देणारा अवलिया ; निवृत्तीनंतर उभी केली कोट्यवधींची कंपनी

मध्यमवर्गीयांच्या गृहस्वप्नाला पंख देणारा अवलिया ; निवृत्तीनंतर उभी केली कोट्यवधींची कंपनी

प्रत्येक देशवासियाकडे  हक्काच्या घर असावं, याच विचारातून त्यांनी  वित्तीय संस्था सुरू करणारे एचटी पारेख यांचा जीवनप्रवास आपण जाणून घेणार आहोत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 04:36 PM2024-01-17T16:36:19+5:302024-01-17T16:38:28+5:30

प्रत्येक देशवासियाकडे  हक्काच्या घर असावं, याच विचारातून त्यांनी  वित्तीय संस्था सुरू करणारे एचटी पारेख यांचा जीवनप्रवास आपण जाणून घेणार आहोत. 

Business success story of hdfc bank founder ht parekh net worth and asset he was lived in mumbai chawl  | मध्यमवर्गीयांच्या गृहस्वप्नाला पंख देणारा अवलिया ; निवृत्तीनंतर उभी केली कोट्यवधींची कंपनी

मध्यमवर्गीयांच्या गृहस्वप्नाला पंख देणारा अवलिया ; निवृत्तीनंतर उभी केली कोट्यवधींची कंपनी

Success Story : आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर समाजात वेगळी ओळख निर्माण करणारी माणसे फार कमीच असतात. काहीतरी हटके करत कल्पनांच्या माध्यमातून सूवर्णमध्य साधत त्याचा फायदा हा प्रत्येकाला व्हावा ही अशी भावना जपणे ही उद्योजकाची खरी ओळख असते. हसमुखलाल ठाकोरदास पारेख म्हणजेच एच. टी पारेख हे त्यातील एक नाव आहे. भारतासारख्या विकसनशील देशात त्यांनी  ९ लाख कोटींच्या मार्केट टर्नओव्हर असलेल्या देशातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक आर्थिक उलाढाल करणाऱ्या HDFC बँकेचा पाया रचला.

भांडवली बाजाराकरिता महत्त्वाचे योगदान दिले अशा व्यक्तींचा धावता परिचय करून देणार आहोत.  एचटी पारेख यांनी आपल्या स्वप्नाचा आयुष्यभर पाठपुरावा केला. चंद्रावर माणसाचे पाऊल पडणे ते त्या काळात जेवढे अशक्य होते, त्याचप्रमाणे घरासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था चांगली चालू शकेल यावरही त्याकाळी कोणी विश्वास ठेवला नव्हता. एच. टी. पारेख मात्र या संकल्पनेने झपाटलेले होते त्यांच्या या संकल्पनेचा पाया रचला.

जीवनप्रवास: 

हसमुख पारेख यांचा १० मार्च १९११ रोजी सुरत येथे झाला.एचटी पारेख यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा प्रेरणादायी आहे. मुंबईतील छोट्याश्या चाळीत राहणारा मुलगा ते कोट्याधिशांच्या यादीत मिळवलेले स्थान वाखाणण्याजोगे आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात बसून आराम करण्याचे दिवस असताना त्यांनी वित्तीय क्षेत्रात क्रांती केली. आधी ICICI बँकेत नोकरी आणि निवृत्तीनंतर एचडीएफसी सुरू करणाऱ्या पारेख यांचे आयुष्य खडतर होते. 

निवृत्तीनंतर HDFC चा पाया रचला :

बॅंकिंग क्षेत्राची सखोल माहिती असणारे पारेख यांनी त्यांच्या निवृत्तीनंतरही कामात मग्न झाले. वयाच्या ६६ वर्षी त्यांनी  हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना केली. आजच्या घडीला या संस्थेची ओळख भारतातील सर्वात मोठी गृहकर्ज उपलब्ध करुन देणारी संस्था अशी बनली आहे. 

शैक्षणिक प्रवास :

पदवीनंतर, पारेख यांना यूकेमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बँकिंग आणि फायनान्समध्ये पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले आणि सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये लेक्चरर झाले. कॉलेज सोडल्यानंतर हरकिशन दास यांनी काही काळ लक्ष्मीदास फर्ममध्ये स्टॉक ब्रोकिंगमध्ये काम केले आणि त्यानंतर त्यांना आयसीआयसीआयमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यानंतर ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदापर्यंत पोहोचले. १६ वर्षे येथे काम करून ते निवृत्त झाले.
 
व्यवसायात वृद्धी :

व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती होऊ लागल्यानंतर पारेख यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. कंपनी स्थापन केल्यानंतर अवघ्या काही वर्षातच HDFC ने १०० कोटींच्या लोन अप्रुव्हल केले. जागतिक बाजारपेठेत कंपनीचा वाढता दबदबा तसेच बॅकिंग क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारकडून त्यांना १९९२ मध्ये  पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात केले.आज त्यांची कंपनी देशातील सुमारे १.७७ लाख लोकांना थेट नोकऱ्या देते.

सर्वाधिक ग्राहकांचा कल असणारी बॅंक :

पारेख यांनी ३० वर्षांनंतर त्यांच्या दोन कंपन्या HDFC आणि HDFC  बँक विलीन करण्याचा निर्णय घेतला.  मार्च २०२३  मध्ये दोन्ही कंपन्याचे विलणीकरण करण्यात आले. या विलीनीकरणानंतर कंपनीच्या व्यवसाात वृद्धी झाली आणि  कंपनीचा एकूण व्यवसाय ४१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. आजच्या घडीला पारेख यांच्या कंपनीची मार्केट व्हल्यू ४.१४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आज एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांची संख्या जर्मनीच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. देशभरात ८,३०० हून अधिक शाखा त्याचबरोबर या बँकेचे सुमारे जगभरात १२ कोटी ग्राहक आहेत. 

Web Title: Business success story of hdfc bank founder ht parekh net worth and asset he was lived in mumbai chawl 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.