Lokmat Money > बिझनेस न्यूज > गडगंज पगाराच्या नोकरीवर सोडलं पाणी; मायदेशी परतून उभी केली ८००० कोटींची कंपनी

गडगंज पगाराच्या नोकरीवर सोडलं पाणी; मायदेशी परतून उभी केली ८००० कोटींची कंपनी

सध्याच्या घडीला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी आपला दबदबा निर्माण केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 02:05 PM2024-06-01T14:05:47+5:302024-06-01T14:09:29+5:30

सध्याच्या घडीला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी आपला दबदबा निर्माण केला आहे.

business success story of mobikwik founder upasana taku who built 8 thousand crore company know about her inspirational journey | गडगंज पगाराच्या नोकरीवर सोडलं पाणी; मायदेशी परतून उभी केली ८००० कोटींची कंपनी

गडगंज पगाराच्या नोकरीवर सोडलं पाणी; मायदेशी परतून उभी केली ८००० कोटींची कंपनी

Success Story : सध्याच्या घडीला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या प्रत्येक क्षेत्रात वावरताना दिसत आहेत. फॅशन इंडस्ट्री असो किंवा तंत्रज्ञानाचे क्षेत्र असो सगळीकडे महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. अशाच एका महिला उद्योजकेची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

कोणतीही व्यवसायिक पार्श्वभूमी नसताना भारताला डिजिटल दुनियेची ओळख करून देणाऱ्या उद्योजिका म्हणजे उपासना टाकू. ज्यावेळी बॅंकिंग व्यवहाराची नोंद ठेवण्यासाठी पासबुकचा आधार घेतला जात असे त्यावेळेस त्यांना मोबाईल वॉलेटची नवी संकल्पना सूचली. सध्या भारतातील यशस्वी महिला उद्योगकांच्या यादीत उपासना टाकू यांचं नाव अव्वल स्थानावर येतं. 

"कुछ पाने कें लिए के कुछ खोना पडता हैं", अशी एक हिंदीत म्हण आहे. याचा प्रत्यय उपासना टाकू यांचा व्यवसायिक प्रवास पाहून येतो.  आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या उपासना टाकू यांनी गडगंड पगाराच्या नोकरीवर पाणी सोडलं आणि त्या भारतात परतल्या. सुरूवातील्या त्यांच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शवला. पण  उपसना यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर उद्योग जगतात नाव कमावलं. सुरूवातीला दोन खोल्यांमध्ये त्यांनी आपल्या व्यवसायाच मुहूर्तमेढ रोवली. अगदी अल्पावधीतच त्यांच्या व्यवसायाने उभारी घेतली.

पार्श्वभूमी-

पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेची वाट धरली. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून उपासना यांनी मॅनेजमेंट सायन्स व इंजिनिअरिंगची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण करताच त्यांनी काही ठिकाणी नोकरीही केली. स्वत: चा व्यवसाय सुरू करण्याआधी त्यांनी  PayPal या अमेरिकन कंपनीत काम केलं. तिथे त्या प्रोडक्ट मॅनेजर या पदावर कार्यरत होत्या. त्याशिवाय HSBC या कंपनीतही त्यांनी नोकरी केली आहे. पण काहीतरी वेगळं करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात घोंगावत होती. त्यासाठी अमेरिकनन कंपनीतील पाणी सोडत त्या मायदेशी परतल्या. २००८ मध्ये उपासना टाकू भारतात आल्या. 

असा उभारला व्यवसाय- 

उपासना भारतात आल्यानंतर २००८ मध्ये त्यांची ओळख बिपीन सिंह यांच्यासोबत झाली. काही वर्षातच त्यांनी बिपीन सिंह यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. २०११ मध्ये त्या विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी बिपीन सिंह यांच्या मदतीने उपासना यांनी आपल्या संकल्पनेवर भर देत मोबिक्विकच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना आर्थिक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली. सध्याच्या घडीला कंपनीची मार्केट व्हॅल्यू  ८ हजार कोटी इतकी असल्याची सांगण्यात येते. 

Web Title: business success story of mobikwik founder upasana taku who built 8 thousand crore company know about her inspirational journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.