Lokmat Money > बिझनेस न्यूज > पहिल्याच प्रयत्नात अपयशी, अंगावर कर्ज तरीही न घाबरता उभी केली ३,००० कोटींची कंपनी 

पहिल्याच प्रयत्नात अपयशी, अंगावर कर्ज तरीही न घाबरता उभी केली ३,००० कोटींची कंपनी 

आयुष्यात घेतलेले निर्णय चुकले, तरीही न डगमगता संकटांशी दोन हात करत व्यवासाय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणारे अमित कुमत हे नाव फार कमीच लोकांना माहित असेल. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 05:09 PM2024-01-22T17:09:02+5:302024-01-22T17:17:20+5:30

आयुष्यात घेतलेले निर्णय चुकले, तरीही न डगमगता संकटांशी दोन हात करत व्यवासाय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणारे अमित कुमत हे नाव फार कमीच लोकांना माहित असेल. 

Business success story of pratap snacks founder amit kumat who made 3 thusand crore company  | पहिल्याच प्रयत्नात अपयशी, अंगावर कर्ज तरीही न घाबरता उभी केली ३,००० कोटींची कंपनी 

पहिल्याच प्रयत्नात अपयशी, अंगावर कर्ज तरीही न घाबरता उभी केली ३,००० कोटींची कंपनी 

Success Story : आज आपण भारतातील सुप्रसिद्ध स्नॅक्स बाजारचे मालक यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. काही निर्णय चुकल्यानंतर त्यावर विचारविनिमय न करता ते चुकीचे निर्णय त्यांनी बरोबर असल्याचे सिद्ध करुन दाखवले.

साधारणत: २००३ मध्ये अमित कुमत आणि  अपूर्व कुमत यांनी त्यांचे मित्र अरविंद मेहता यांच्या या व्यवसायाची सुरुवात केली. प्रताप स्नॅक्स भारतीय कंपनीच मालक अमित कुमत यांनी स्वत: च्या मेहनतीच्या जोरावर भलं मोठं बिझनेस एम्पायर उभं केलंय. आजच्या घडीला प्रताप स्नॅक्स या  कंपनीचा टर्नओव्हर जवळपास ३ हजार कोटी इतका आहे. एफएमजी सेक्टरमध्ये या कंपनीचं नाव मोठ्या आदराने घेतले जाते. सध्या प्रताप स्नॅक्स या कंपनीचे देशभरात चार कारखाने आणि वितरण नेटवर्क आहे. ज्यात २,९०० वितरक,  १६८ सुपर स्टॉकिस्ट आहेत जे २४ राज्ये आणि लडाख सारख्या केंद्रशासित प्रदेशात पसरलेले आहेत.

चुकीच्या निर्णयाने बदलंल आयुष्य :

पण अमित कुमत यांचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. तरीही न घाबरता अमित यांनी धाडसी पाऊल उचलंल. काही काळ स्नॅक्स सेंटरमध्ये काम केल्यानंतर त्यांनी केमिकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या चुकीच्या निर्णयाची त्यांनी फार मोठी किंमत मोजावी लागली. त्यामुळे अमित कुमत यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला. अशा परिस्थितीतही अमित यांनी धीर धरला. त्यांना स्वत: चं वेगळं विश्व निर्माण करायचं होतं. 

 व्यवसायात पदार्पण :

अखेरीस २००२ मध्ये अपूर्व कुमत आमि मित्र अरविंदच्या साहाय्याने त्यांनी स्नॅक्स सेंटर चालु केले. हातात पैसा नसतानाही कुटुंबियांनी अमित यांमनी काही पैसे उसणे घेतले.घरच्यांकडून १५ लाखांचा रक्कम घेत त्यांना नव्या व्यवसायाचा श्री गणेशा केला. सुरुवातीला पनीर बॉल्सची विक्री करत या तिघांनी व्यवसायात पाऊल ठेवलं.

'मला माहित होतं की मला एक यशस्वी उद्योजक बनायचं होतं आणि स्नॅक्स बाजारात आवड असल्याने मी त्याची सखोल माहिती मिळवली' , असं अमित कुमत सांगतात. सुरुवातीच्या काळात स्नॅक्स बाजारात काम केल्यामुळे त्यांना या व्यवासायाची थोडी फार माहिती होती. त्यांच्या या कामामुळे अमित यांच्या डोक्यात बिझनेसची कल्पना आली. 

सिनेस्टार बनले ब्रँड अ‍ॅम्बेसेडर :

इंदूरमधील एका सामान्य कार्यालयात काम करताना, त्यांची जिद्द आणि उद्योजक बनण्याचे विचार येऊ लागेल. त्यातूनच  प्रताप स्नॅक्सचा जन्म झाला, ज्याच्या आधारावर त्यांनी नंतर नमकीन आणि बटाटा चिप्सचा लोकप्रिय यलो डायमंड ब्रँड तयार केला. हळूहळू त्याचा व्यवसाय यशस्वी होत गेला. अभिनेता सलमान खान कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडरही होता. ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षात प्रताप स्नॅक्स लिमिटेडची कंपनीचा मार्केट कॅप ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. आज अमित कुमत यांचे नाव भारतातील यशस्वी उद्योदगांच्या यादीत आदराने घेतले जाते.

Web Title: Business success story of pratap snacks founder amit kumat who made 3 thusand crore company 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.