Success Story : जगामध्ये अशी मोजकीच माणसं असतात जी स्वबळावर, मेहनतीनं आपलं नशीब चमकवतात. त्यासाठी वाटेल तेवढा संघर्ष करण्याची तयारी या लोकांमध्ये असते. पडेल ते काम करुन नशीबालाही झुकवणारे लोक या दुनियेत फार कमी असतात. लक्ष्मण मित्तल दास याचं नाव अशा लोकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावं लागेल. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी व्यवसायिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
विश्रांती करण्याच्या वयात सोनालिका ट्रॅक्टरचे मालक लक्ष्मण मित्तल यांनी व्यवसायाची उभारणी केली. सध्याच्या घडीला लक्ष्मण दाल मित्तल प्रसिद्ध सोनालिका ग्रुपचे मालक आहेत. जगातील तिसरी सर्वात मोठी ट्रॅक्टरची विक्री करणारी कंपनी म्हणून सोनालिका ग्रुपची ख्याती सातासमुद्रापार पसरली आहे.
पै-पै पैसा जोडून आपल्या निवृत्तीच्या वयात लक्ष्मण दास मित्तल यांनी सोनीलिकी ग्रुपसारखं बलाढ्य व्यवसायिक साम्राज्य उभं केलं. या नामांकित कंपनीचा पाया रचताना त्यांना अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागले, तरीही न खचता संकटांशी दोन हात करत त्यांनी यशाला गवसणी घातली.
एलआससी एजंट ते करोडपती :
पंजाबच्या होशियारपूर येथे १९३१ मध्ये लक्ष्मण दास मित्तल यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल हुकुम चंद अग्रवाल मंडीमध्ये धान्य व्यापारी होते. आपल्या सुरुवातीच्या काळात त्यांनी एक एलआयसी एजंट म्हणून काम पाहिलं. उतारवयात स्व-कष्टाने जमा केलेली पुंजी त्यांनी व्यवसाय उभारणीसाठी वापरली. या पैशातून त्यांनी व्यवसायाचा श्री गणेशा केला. बालपणापासून शेती करण्याची आवड त्यांना होती. मातीशी नाळ जोडलेला हा उद्योगपती आज ‘द ट्रॅक्टर टाइटन’ यैा नावाने ओळखला जातो.
कोट्यवधींची कंपनी उभी केली :
लक्ष्मण दास मित्तल यांनी स्वबळावर सोनालिका ग्रुपचा पाया रचला. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी व्यवसाय क्षेत्रीत पदार्पण केलं. विश्रांती घेण्याच्या वयामध्ये त्यांनी कोट्यवधींची कंपनी उभी केली. वयाच्या ९२ व्या वर्षी लक्ष्मण दास मित्तल भारतातील दुसरे सर्वात वयस्कर अब्जाधीश ठरलेत. अलीकडेच जारी झालेल्या फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा समावेश झाला असून त्यांची एकूण संपत्ती सुमारे २.५ अब्ज डॉलर इतकी आहे.