नवी दिल्ली - पितृ पक्षाला सुरुवात होताच व्यापारामध्ये मोठी घट झाली आहे. याचा परिणाम काही व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात तर काहींवर कमी प्रमाणात पडला आहे. सोन्या चांदीच्या व्यापाराला सर्वाधिक फटका बसला आहे. सोन्या-चांदीचा व्यापार हा सुमारे २५ टक्कांनी घसरला आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही लोक आताच बुकिंग करून नवरात्रीमध्ये डिलिव्हरी घेण्याचा विचार करत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते पितृपक्षानंतर कारभारात वेगाने वाढ होणार आहे.
पितृपक्षादरम्यान, एकूण व्यापारात १० टक्क्यांनी घसरण झाली आहे. हिंदू धर्माच्या सनातन संस्कृतीमध्ये १६ दिवसीय पितृपक्ष पंधरवडा मानला जातो. यादरम्यान, सर्व प्रकारच्या मंगल, वैवाहिक आणि इतर शुभ कार्ये केली जात नाहीत. बहुतांश लोक यादरम्यान केवळ आवश्यक सामानाची खरेदी करतात.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, पितृपक्षामध्ये एकूण मिळून १० टक्के व्यापार कमी झाला आहे. सर्वाधिक फटका सोने आणि चांदीच्या व्यापाराला बसला आहे. यामध्ये २५ टक्क्यंनी घट झाली आहे. कारण सोन्या-चांदीची खरेदी शुभ कार्यासाठी केली जाते. पितृपक्षामध्ये लोक सोने चांदी खरेदी करत नाहीत. त्यांनी सांगितले की, व्यापारासाठी खूप महत्त्वपूर्ण दिवस असतात. येणाऱ्या पूर्ण वर्षाच्या व्यापाराचे नियोजन हे या १५/१६ दिवसांमध्ये होते.
ज्वेलर्स मोहित सोनी यांनी सांगितले की, व्यापारामध्ये ५० टक्क्यांहून अधिकची घट झाली आहे. यादरम्यान, लोक नव्या सामानाची खरेदी करत नाही आहेत. ते पसंत करून वस्तूंच बुकिंग करून ठेवत आहेत. तसेच या वस्तू नवरात्रीमध्ये खरेदी करण्याबाबत बोलत आहेत. त्यांच्या मते अशा प्रकारचा ट्रेंड दरवर्षी असतो. नवरात्रीपासून बाजार वाढण्यास सुरुवात होते. ती पुढच्या सहा महिन्यांपर्यंत सुरू राहते.